Shiv Jayanti 2023: म्हणे शिवाजी कधीही विकला जात नाय.. विनय आपटेंना आलेला तो वाईट अनुभव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shiv jayanti 2023, vinay apte, shivaji maharaj

Shiv Jayanti 2023: म्हणे शिवाजी कधीही विकला जात नाय.. विनय आपटेंना आलेला तो वाईट अनुभव

Vinay Apte About Shivaji Maharaj: आज शिवजयंती. संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात शिवजयंती साजरी केली जात आहे. सध्या संपूर्ण भारतात सिनेमांच्या माध्यमातून शिवाजी महाराज यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहचत आहेत.

पण एक काळ असा होता कि, शिवाजी महाराजांना लोकांच्या माध्यमातून पोहचवण्यासाठी निर्मात्यांना इतका रस नव्हता. असा वाईट अनुभव दिवंगत अभिनेते, दिग्दर्शक विनय आपटेंना आलाय.

झी मराठीवरील खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात विनय आपटेंनी हा वाईट अनुभव सांगितलाय. विनय आपटे शिवाजी महाराजांवर आधारित मेगा सीरिज करणार होते.. खूप मोठा प्रोजेक्ट होता.

पण विनय आपटे यांचे काही अंदाज चुकले. 40 एपिसोड्स नंतर विनय आपटेंना प्रोजेक्ट बंद करावं लागलं. कितीही म्हटलं तरीही आर्थिक सोंग आणता येत नाहीत..

विनय आपटे यांनी लोकांकडे मदतीचं आवाहन केलं असतं तर त्यांच्या मालिकेसाठी त्यांना भरपूर आर्थिक मदत मिळाली असती.. पण त्यांनी तसं केलं नाही. ज्या पद्धतीने विनय आपटेंनी मालिका सुरू केली होती त्या पद्धतीने त्या मालिकेचा शेवट करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण ते झालं नाही.

पण शिवाजी महाराजांवरचा मोठा प्रोजेक्ट पूर्ण झाला नाही याचं त्यांना दुःख नाही. खरी गोष्टी वेगळीच आहे.

ज्यावेळेला विनय आपटे ती सिरियल मार्केटला विकायला गेले.. तेव्हा मार्केट वाले त्यांना म्हणाले की, "शिवाजी बिक नहीं सकता.." याचा अर्थ असा होता कि, ही सिरियल मार्केट मध्ये विकता येणार नाही. पण या गोष्टींचा विनय आपटे यांना खूप त्रास झाला.

शिवाजी not sellable.. शिवाजी बीक नहीं सकता.. हि वाक्य त्यांच्या मनात सारखी येत होती. एक दिवशी त्यांनी चिडून म्हटलं.. शिवाजी बिकनेवाली चीज ही नही है पागल...बात मत कर.. झगडा हो जाएगा..

पुढे काही राजकीय लोकांकडे मालिकेत लागणाऱ्या आवश्यक गोष्टींसाठी विनय आपटे गेले होते. तेव्हा एक राजकारणी म्हणाले,"काय आहे ना विनय. शिवाजी हा pan india विषय नाही. संपूर्ण भारतात हा विषय चालू शकणार नाही".

मग विनय आपटेंनी केला की,"तुम्ही राज्यकर्ते तिथे बसून करता काय.. जर शिवाजी हा pan india सब्जेक्ट नाही, आणि तो नसेल तर हा विषय pan india करण्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय." त्यामुळे भारत सरकारकडून कोणतीही मदत मिळणार नाही असं विनय आपटे यांना सांगण्यात आलं.

त्यामुळे शिवाजी महाराजांवरची मालिका पूर्ण झाली नाही या दुःखापेक्षा या दोन वाक्यांचा विनय आपटे यांना आठवडाभर खूप त्रास झाला. आम्ही ज्याला देव समजतो तो विकला जात नाही असं ऐकल्यावर त्यांना खूप वाईट वाटलं.

आणि विनय आपटे यांनी दिग्दर्शित केलेली शिवाजी महाराजांवरची मालिका कधीही पूर्ण झाली नाही. त्यांचं ते स्वप्न अधुरं राहील...