Vishakha Subhedar: वनीताच्या लग्नात लता मंगेशकरांनी दिलेली साडी विशाखा सुभेदार यांनी नेसली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lata mangeshkar, vanita kharat, vishakha subhedar

Vishakha Subhedar: वनीताच्या लग्नात लता मंगेशकरांनी दिलेली साडी विशाखा सुभेदार यांनी नेसली

Vishakha Subhedar News: काल भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांचा पहिला स्मृतिदिन झाला. अनेक कलाकारांनी त्यांच्या खास शब्दातून लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली. कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदार यांनीही लता मंगेशकर यांची खास आठवण सर्वांना सांगितली. लता मंगेशकर यांनी विशाखा सुभेदार यांचा अभिनय पाहून त्यांना खास साडी भेट दिलेली.

विशाखा सुभेदार यांनी सोशल मीडियावर हि सर्व आठवण सांगितली आहे. विशाखा लिहितात.. आज हा फोटो माझा नाही तर ह्या मी नेसलेल्या साडीचा आहे...हे वस्त्र नाही हा आशीर्वाद आहे..भारतरत्न, गानकोकिळा. लता मंगेशकर.. ह्यांचा. हास्यजत्रेमधलं उर्दू गायिका, हे पात्र निभावलेले ते स्किट त्यांना प्रचंड आवडलं, त्या म्हणाल्या तू उर्दू बोललीयस ते फार छान बोललीयस.. मी सुद्धा अनेक उर्दू शब्द गायलेयत,त्यांचे उच्चार अवघड असतात.

तू खरच खुप छान जमवलंस. आणि त्यांनीही नाटकात काम केलं त्या वेळेस झालेली गंमत देखील सांगितली.त्यांनी शाबासकी म्हणून हा आशीर्वाद दिला.covid प्रकरण निवळलं किं आम्ही भेटायला जाणार होतो पण... दुर्दैव.राहून गेलं. त्या आपल्यात नाहीयत पण त्यांचा आवाज आपल्याला जिवंत ठेवतो..! अंगाई ते म्हातारपण सगळ्या वयाशी त्यांचा आवाज त्यांची गाणी connect होतात. आणि त्या सर्वश्रेष्ठ बाईंचा, लतादीदींचा,आम्हाला फोन आला..!

त्यांनी फोन वर केलेल्या गप्पा आजही माझ्या कानात आहेत.. तो दिवस न विसरण्यासारखा होता.ही साडी अंगावर नेसताना काय वाटत होत ते मी शब्दात नाही सांगू शकत..देवाचे आभार मानले, लताबाईंचे नाव घेतले त्यांना सांगितलं "तुम्ही दिलेली साडी नेंसतेय."आणि Samir Choughule , Sachin Mote, Sachin Goswami हास्यजत्रेचे Amit Phalke चे सुद्धा आभार मानले.ह्या सगळ्यांमुळेच हे आशीर्वाद रुपी वस्त्र मला मिळाले.

अशी पोस्ट लिहीत विशाखा सुभेदार यांनी लता मंगेशकर यांची एक भावुक आठवण सांगितली आहे. लता मंगेशकर यांनी दिलेली साडी विशाखा ताईंनी वनिता खरातच्या लग्नात नेसलेली. एखाद्या कलाकाराला महान गायिका लता मंगेशकर यांच्याकडून मिळालेली हि दिलखुलास दाद आयुष्यभर लक्षात राहणारी आहे.

त्यामुळे विशाखा सुभेदार यांच्या मनातल्या भावना शब्दात सांगता न येण्यासारख्या.. विशाखा सुभेदार सध्या स्टार प्रवाह वरील शुभविवाह या मालिकेत अभिनय करत आहेत.