Aadujeevitham The Goat Life: अंदर से कोई बाहर ना जा सके...; 'आदुजीविथम: -द गोट लाइफ'चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज

Aadujeevitham The Goat Life: 'आदुजीविथम: -द गोट लाइफ' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Aadujeevitham: The Goat Life
Aadujeevitham: The Goat Lifeesakal

Aadujeevitham-The Goat Life: दाक्षिणत्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. पृथ्वीराजचा सालार हा चित्रपट गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता सालार या चित्रपटानंतर पृथ्वीराजचा 'आदुजीविथम-द गोट लाइफ' (Aadujeevitham-The Goat Life) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

ट्रेलरमधील पृथ्वीराज सुकुमारनच्या जबरदस्त अभिनयानं वेधलं लक्ष

'आदुजीविथम-द गोट लाइफ' या चित्रपटाचा 1 मिनिट 33 सेकंदाच्या ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये 'अंदर से कोई बाहर ना जा सके......'. हा एकच डायलॉग ऐकू येतो. ट्रेलरमध्ये सगळीकडे केवळ वाळवंट दिसते. वाळवंटात फिरणाऱ्या पृथ्वीराज सुकुमारनची झलक देखील ट्रेलरमध्ये दिसते. वाढलेली दाढी आणि वाढलेले केस अशा लूकमध्ये पृथ्वीराज दिसतो. ट्रेलरमधील पृथ्वीराज सुकुमारनच्या जबरदस्त अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सत्य घटनेवर आधारित 'आदुजीविथम'

बेंजामिन यांच्या 'आदुजीविथम' या कादंबरीवर आधारित असणाऱ्या 'आदुजीविथम-द गोट लाइफ' हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ब्लेसी यांनी केलं आहे. चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन व्यतिरिक्त अमला पॉलनं देखील काम केलं आहे.

पाहा ट्रेलर:

कधी रिलीज होणार चित्रपट?

काही दिवसांपूर्वी 'आदुजीविथम-द गोट लाइफ' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. या टीझरमध्ये फिल्म मेकर्सनं या चित्रपटाची रिलीज डेट देखील सांगितली होती. 10 एप्रिल रोजी हा चित्रपट रिलीज होईल असं तेव्हा सांगण्यात आलं होतं.पण आता या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. आता हा चित्रपट 28 मार्च रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिल, तेलुगू आणि कन्नड भाषेत रिलीज होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Aadujeevitham: The Goat Life
The GOAT Life: 'सालार'नंतर पृथ्वीराजचा नवीन सिनेमा, प्रभासने शेअर केला फर्स्ट लूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com