Aai Kuthe Kay Karte: जिची दृष्ट लागते तिनेच.. लेकानेच अरुंधतीचा केला अपमान.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aai Kuthe Kay Karte abhishek insult her mother arundhati at anagha baby girl welcoming home

Aai Kuthe Kay Karte: जिची दृष्ट लागते तिनेच.. लेकानेच अरुंधतीचा केला अपमान..

Aai kuthe kay karte update: 'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. रोज नवा ट्विस्ट नवं वळण ही मालिका घेत आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेत अनघाच्या डोहाळजेवणाचा घाट घातला होता. यावेळी अरुंधती म्हणजेच आई अभीचं बाहेर प्रेम प्रकारण सुरू असल्याचं सर्वांसमोर उघड करते. आपण गरोदर असताना आपल्या नवऱ्याचं बाहेर प्रेमप्रकारण आहे ही कळताच अनघा भर डोहाळ जेवणात चक्कर येऊन पडते आणि मालिका अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर पोहोचते.

(Aai Kuthe Kay Karte abhishek insult her mother arundhati at anagha baby girl welcoming home)

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: मोठा धक्का! यंदा दोन सदस्य घराबाहेर.. विकास सावंत गेला.. आज कुणाचा नंबर?

अभिषेकने अनघाशी प्रतारणा केल्याने मालिकेला आता वेगळं वळण लागलं आहे. अनघा डोहाळ जेवणात चक्कर येऊन पडते. ती अत्यवस्थ झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात नेले जाते. अनघाच्या गरोदरपणात आधीपासूनच कॉम्प्लिकेशन होते. त्यात घडल्या प्रकारामुळे तिची प्रकृती अधिक खलावते. आता एक पुढची अपडेट समोर आली आहे.

हेही वाचा: Pushkar Shrotri: रंगाचा आणि धर्माचा काय संबंध.. पुष्कर श्रोत्री कडून राम कदमांचा समाचार..

अनघाची प्रसूती झालेली असून तिला मुलगी झाल्याचे दाखवण्यात आले आहे. अनघाच्या या अवस्थेला स्वतः अभिषेक जबाबदार असला तरी त्याचे बिंग फोडल्याने आईच जबाबदार असल्याचे तो मानतो अनई आईला दोषही देतो. ज्या आईने एकेकाळी अभिला संकटातून वाचवलं तोच अभि आज आईचा अपमान करताना दिसणार आहे.

अभि आणि अनघा आपल्या लहानग्या मुलीला घेऊन देशमुखांच्या घरी येतो. तिच्या येण्याने सगळेच खुश आहेत. यावेळी अरुंधती अनघा आणि बाळाची दृष्ट काढायला पुढे येते. तेव्हा अभि आईला अडवतो आणि म्हणतो, जिची दृष्ट लागते तिनेच दृष्ट काढली तर काय फायदा.. आईचा अपमान होताच अनघा मध्ये पडते अभिला सुनावते. अनघा म्हणते.. 'ही फक्त तुझी मुलगी नाही.. माझीही आहे' ती अरुंधतीला पाठींबा देते आणि बाळाला आईकडे सोपवते. हा रंजक भाग लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :Marathi Serialstar pravah