

स्टार प्रवाह मराठी वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका सध्या चर्चेत आली आहे. गृहिणीची भूमिका साकारणारी अरुंधती आपली गाण्याची आवड जपत यशाला गवसणी घालताना दिसत आहे. काहीदिवसांपूर्वी, सुखाचे चांदणे हे तिनं पहिलं गाणं गायीले. हे गाणं अल्पावधीतच लोकप्रिय झालं. दरम्यान, काही दिवसांपासून या मालिकेत अरुंधती आणि आशुतोष एकत्र गाणं गाणार असल्याची चर्चा सुरु होती. अशातच दोघांच ड्युएट गाणं रीलीज झालं आहे.
आई कुठे काय करते या मालिकेत पहिल्यांदाच अरुंधती आणि आशुतोष दोघं मिळून ड्युएट गात आहेत. त्यांचं रेकाॅर्डिंग पाहायला अनिरुद्धही पोहोचला आहे. ईशा आणि यशही रेकाॅर्डिंगला आले आहेत. प्रेक्षकांना एक नवं गाणं मिळणार आहे.
अरुंधती आणि आशुतोषचं डुएट गाणं रेकाॅर्ड होत आहे. अरुंधतीला आशुतोष साथ देत आहे. सोबतीस हलके, सावलीस ऊन, भोवती तशीही मोरपीस खूण... अशी गाण्याची सुरुवात आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
स्टुडिओत या गाण्याचं रेकाॅर्डिंग होत असताना यश, गौरी तिथे आहेतच. पण अरुंधतीचं गाणं ऐकायला चक्क अनिरुद्ध आला आहे. अर्थात, ते अरुंधतीला अजिबात आवडलं नाही. त्याला पाहून ती तिचे क्षणभर सूर बेसूर होतात. मग निलेश मोहरीर तिला तशा सूचना करतो आणि गाणं पुढे चालू राहतं.
सध्या हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे. मंदार आपटे आणि विद्या करलगिकर यांचा हा आवाज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.