Aai Kuthe Kay Karte फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेचं शिवप्रेम पाहून वेडे व्हाल.. थेट जेसीबीवरच.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ashvini mahangade, aai kuthe kay karte, shiv jayanti

Aai Kuthe Kay Karte फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेचं शिवप्रेम पाहून वेडे व्हाल.. थेट जेसीबीवरच..

Aai Kuthe Kay Karte News: आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेत अनघाची भूमिका साकारत आहे अभिनेत्री अश्विनी महांगडे. अश्विनीने साकारलेली अनघाची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे.

मालिकेत अनघाचं अभिशी असलेलं नातं आणि सासू अरुंधती सोबत असलेलं भावनिक नातं चर्चेत असतं. अश्विनी (Ashvini Mahangade) तिच्या संस्थेतून सामाजिक भान जपत असते. शिवजयंती निमित्त अश्विनीने एक खास गोष्ट केलीय त्याची सर्वत्र चर्चा आहे.

अश्विनी रयतेचं स्वराज्य संस्थान प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था चालवते. या संस्थेअंतर्गत अश्विनी विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. अश्विनीने तिच्या संस्थेअंतर्गत शिवजयंती साजरी केली. हि शिवजयंती विशेष चर्चेत राहिली.

अश्विनीच्या संस्थेतर्फे वाईला एका मैदानात शिवजयंती साजरी करण्यात आली. या मैदानात खास JCB आणण्यात आला.

या JCB वर शिवरायांची प्रतिमा असलेलं पोस्टर दिमाखात फडकवण्यात आलं. या प्रतिमेत फुलांचा समावेश होता. त्यामुळे प्रतिमा संपूर्ण फडकताच महाराजांच्या प्रतिमेवर अनोखी पुष्पवृष्टी झाली.

हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झालाय. अश्विनीच्या फॅन्सने या अनोख्या गोष्टीबद्दल तिचं कौतुक केलंय.

अश्विनी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत राणूअक्कांच्या भूमिकेत झळकली. या मालिकेपासून अभिनेत्री अश्विनी महांगडे हिची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली. अश्विनी खऱ्या आयुष्यात सामाजिक भान जपणारी संवेदनशील अभिनेत्री आहे.

रयतेचं स्वराज्य संस्थान प्रतिष्ठानच्या अंतर्गत अश्विनी तिच्या गावी अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते. त्यामुळे अश्विनीचं खूप कौतुक होत असतं.

अश्विनी सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम असून हि मालिका सोमवार ते शनिवार ७.३० वाजता स्टार प्रवाह वर पाहायला मिळेल. मधुराणी प्रभुलकर, मिलिंद गवळी, ओंकार गोवर्धन, इला भाटे अशा कलाकारांच्या कुठे काय करते मालिकेत महत्वाच्या भूमिका आहेत.