esakal | 'आई कुठे काय करते'मधील अभिनेत्रीने वाढदिवशी केलं अवयव दान
sakal

बोलून बातमी शोधा

aai kuthe kay karte

नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

'आई कुठे काय करते'मधील अभिनेत्रीने वाढदिवशी केलं अवयव दान |Aai Kuthe Kay Karte

sakal_logo
By
स्वाती वेमूल

टेलिव्हिजनवरील काही मालिकांना अल्पावधीतच प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतं. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' Aai Kuthe Kay Karte ही त्यापैकीच एक मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. या कलाकारांचा सोशल मीडियावरील चाहतावर्गसुद्धा वाढत आहे. मालिकेत विमलची भूमिका साकारणारी अभिनेत्री सीमा घोगळेने Seema Ghogale नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त सीमाने स्वत:लाच एक अनोखी भेट दिली आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत सीमाने याबद्दल सांगितलं आहे.

'मी अवयव दान केलंय. माझ्याकडून मलाच वाढदिवसाचं गिफ्ट. मला ४० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा,' असं कॅप्शन देत सीमाने अवयव दान केल्याचं कार्ड पोस्ट केलं आहे. सीमाच्या या निर्णयाचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे. 'स्वत:ला अतिशय मोलाची भेट दिली आहेस', असं एकाने म्हटलंय. तर 'उत्तम निर्णय घेतलंस' असं दुसऱ्याने लिहिलंय.

हेही वाचा: असं आहे 'तुझ्या माझ्या संसाराला..' मालिकेतील मोठ्या बाईंचं खरं कुटुंब

सीमाने याआधीही अनेक मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. 'आई कुठे काय करते' या मालिकेत ती साकारत असलेल्या विमल या भूमिकेलाही प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळतंय. अभिनेत्रीसोबतच सीमा ही उत्तम नृत्यांगना आहे. मालिकांसोबतच तिने चित्रपट आणि नाटकातही काम केलं आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेत भोंडल्याचा खेळ रंगणार आहे. सध्या घरात तणावाचं वातावरण असलं तरी कांचन आजीने मात्र पुढाकार घेत हा नवरात्रीचा सण साजरा करण्याचं ठरवलं आहे.

loading image
go to top