असं आहे 'तुझ्या माझ्या संसाराला..' मालिकेतील मोठ्या बाईंचं खरं कुटुंब

मालिकेतील मोठ्या बाई या खऱ्या आयुष्यातही मोठी जाऊ
Anjali Joshi
Anjali Joshi
Summary

मालिकेतील मोठ्या बाई या खऱ्या आयुष्यातही मोठी जाऊ

प्रत्येकाला आपलीशी वाटणारी आई, जाऊ, सून आणि एक उत्तम अन्नपूर्णा असलेली टीव्हीवरील लोकप्रिय व्यक्तिरेखा म्हणजे झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' tujhya majhya sansarala aani kay hava मालिकेतल्या मोठ्या बाई. मालिकेप्रमाणेच मोठी बाई ही भूमिकादेखील गाजतेय. ही भूमिका अभिनेत्री अंजली जोशी Anjali Joshi अगदी चोख बजावत आहेत. या मालिकेत एकत्र कुटुंबपद्धती खूप सुंदररित्या दाखवण्यात आली आहे.

एकत्र कुटुंबपद्धतीबद्दल बोलत असताना अंजली म्हणाल्या, "मी लग्नानंतर एकत्र कुटुंबात आले आणि मालिकेप्रमाणेच मी खऱ्या आयुष्यातदेखील मोठी जाऊ आहे. माझ्या लग्नानंतर वर्षभरात दोन लहान जावादेखील कुटुंबात आल्या. त्यामुळे सासू सासरे, मी, माझे पती आणि माझे दोन दीर आणि जावा असे आम्ही सगळे एकत्र राहत होतो. मालिकेप्रमाणेच आमचं खूप गोड आणि प्रेमळ कुटुंब आहे. आम्ही सर्व जावा जवळपास एकाच वयाच्या असल्यामुळे आमच्यातील बॉण्डिंगदेखील खूप छान आहे. नंतर मुलं मोठी झाल्यामुळे जागेअभावी आम्ही वेगळे राहायला लागलो पण सण आणि वाढदिवसांना आम्ही एकत्र असतो आणि मिळून सर्व साजरे करतो. त्यामुळे मला अजूनही मी एकत्र कुटुंब पद्धतीत असल्यासारखंच वाटतं."

Anjali Joshi
Drugs case: शाहरुख-गौरी आर्थर रोड तुरुंगात सतत करतायत फोन, कारण..

सेटवरील त्यांच्या कुटुंबाबद्दल बोलताना अंजली म्हणाल्या, "आम्ही सेटवर सर्वजण मिळून खूप धमाल करतो. मला सेटवर सगळे मोठ्या बाईच म्हणतात. आम्हा देशमुख सुनांचे स्वयंपाक घरात खूप सीन्स शूट झाले आहेत. आम्ही तिथे पाककला करतो. एकदा आम्ही संपूर्ण युनिटसाठी शिरा केला होता आणि तो सगळ्यांना खूप आवडला होता. इथे आम्ही कुटुंबाप्रमाणेच सगळे एकमेकांना सांभाळून घेतो आम्ही नाशिकमध्ये शूटिंग करतोय. बरेच जण नाशिकच्या बाहेरचे आहेत आणि आपल्या कुटुंबापासून दूर आहेत. पण आम्ही इथे सगळे एका कुटुंबाप्रमाणेच गुण्यागोविंदाने राहतो."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com