aai kuthe kay karte arundhati actress madhurani gokhale prabhulkar
aai kuthe kay karte arundhati actress madhurani gokhale prabhulkar file image

'आई कुठे काय करते'मधील 'अरुंधती'च्या नव्या फोटोने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

अभिनेत्री मधुराणी यांच्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव
Published on

'आई कुठे काय करते' Aai Kuthe Kay Karte या लोकप्रिय मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर Madhurani Prabhulkar सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. त्यांनी नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला असून नेटकऱ्यांमध्ये त्याचीच चर्चा होत आहे. गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये मधुराणी यांचं सौंदर्य खुलून दिसत आहे. 'गुलाबी हा फक्त रंग नाही, तो अॅटिट्यूड आहे', असं कॅप्शन त्यांनी हा फोटो पोस्ट केला आहे. मालिकेत मधुराणी अत्यंत साध्या वेशात पहायला मिळतात. त्यामुळे सोशल मीडियावरील त्यांचा हा वेगळा अंदाज नेटकऱ्यांना पहायला आवडतो. त्यांच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

अभिनेत्री अपूर्वा गोरेनं या फोटोंवर कमेंट करत लिहिलं, 'मार डाला'. तर एका युजरने 'प्रभावी फोटो' असं म्हणत मधुराणी यांचं कौतुक केलं आहे. 'आई कुठे काय करते या मालिकेत तुम्हाला पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या नजरेत तुमची पूर्णपणे वेगळी प्रतिमा निर्माण करण्याची क्षमता असलेला हा फोटो, खरंच प्रभाव आहे', असं त्या युजरने लिहिलं. 'तुम्ही खूप सुंदर दिसता आणि त्याहून सुंदर अभिनय करता', असंही एकाने लिहिलं.

aai kuthe kay karte arundhati actress madhurani gokhale prabhulkar
'बिग बॉस मराठी ३'चा ग्रँड फिनाले पुढे ढकलणार?

'आई कुठे काय करते' या मालिकेवर नुकताच पुरस्कारांचा वर्षाव झाला. या मालिकेला दादासाहेब फाळके आयकॉनिक अवॉर्ड फिल्म्समध्ये (DPIAF) २०२१ चार पुरस्कार मिळाले आहेत. मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांना मराठी टीव्हीवरील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. ही मालिका सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अरुंधती आणि आशुतोष यांच्यात मैत्री होणार का, हे प्रेक्षकांना पुढील भागात पहायला मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com