'आई कुठे काय करते'मधल्या 'संजना'ला कोरोना | Rupali Bhosale | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Milind Gawali and Rupali Bhosle

'आई कुठे काय करते'मधल्या 'संजना'ला कोरोना

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसलेला (Rupali Bhosle) कोरोनाची लागण झाली. रुपालीने इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहित चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली. 'योग्य ती सर्व काळजी घेऊनसुद्धा माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे', असं तिने लिहिलंय.

रुपालीची पोस्ट-

'सर्वप्रकारची काळजी घेऊनसुद्धा मला कोरोनाची लागण झाली. मी सर्व प्रोटोकॉल्सचं पालन करत असून सध्या घरातच क्वारंटाइनमध्ये आहे. मला खात्री आहे की मी यातून लवकरच बरी होईन. कृपया सर्वांनी सुरक्षित रहा आणि मास्कचा वापर करा. स्वत:ची आणि इतरांचीही काळजी घ्या', अशी विनंती तिने चाहत्यांना केली.

हेही वाचा: 'अबोली'मध्ये होणार 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीची एण्ट्री

रुपालीनं अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र आई कुठे काय करते या मालिकेतील संजनाच्या नकारात्मक भूमिकेमुळे तिला फार प्रसिद्धी मिळाली. तसंच सुमीत राघवनसोबत 'बडी दूर से आये है' या हिंदी मालिकेतही तिने काम केलं. रुपाली 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या सिझनमध्ये सहभागी झाली होती.

राज्यात सोमवारी दिवसभरात ३३ हजार ४७० कोरोना रुग्णांचं निदान झालं. दिवसभरात २९ हजार ६७१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पुढे गेल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढू लागला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top