'आयुष्यातलं पहिलं फोटोशूट आणि..' या अभिनेत्रीला ओळखलं का? सांगितली खास आठवण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

madhurani prabhulkar first photo shoot

'आयुष्यातलं पहिलं फोटोशूट आणि..' या अभिनेत्रीला ओळखलं का? सांगितली खास आठवण

एखाद्या कलाकारावर आपण मनापासून प्रेम करत असतो. त्यांच्या आवडीनिवडी, दैनंदिन आयुष्य, काही गुपितं जाणून घेण्यात आपल्याला विशेष रस असतो. पण बऱ्याचदा त्या कलाकाराचं असं एखादं रूप समोर येतं की आपण त्याला रोज पाहूनही ओळखू शकत नाही. अशीच गम्मत आज एका अभिनेत्रीने केली आहे. मालिका विश्वात अत्यंत लोकप्रिय असलेल्या अभनेत्रीने तिच्या आयुष्यात केलेल्या पहिल्या फोटोशूटचा फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा: आर्ची आली आर्ची.. रिंकू राजगुरुचा नवा चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित..

(star pravah) स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेतील (Aai Kuthe Kay Karte) एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिचा एक जुना फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने काही आठवणीही सांगितल्या आहेत. हा अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या सर्वांच्या लाडकी अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) आहे. तिचं हा फोटो पाहून अनेकांना धक्काच बसला.

मधुराणी सध्या आपल्या अभिनयानं चाहत्यांना भुरळ घालत असली तरी तिच्या आयुष्यातील पहिला फोटोशूट कसा होता हे आज तिनं सांगितलं आहे. या फोटोसह एक कॅप्शनही तिने दिले आहे. ती म्हणते, ‘मुंबईत आल्यानंतरचं माझं पहिलं वहिलं फोटो शूट... सुकन्या कुलकर्णी मोने ह्या माझ्या ज्येष्ठ सखीने मला ह्या अमेझिंग फोटोग्राफरचं नाव सुचवलं... आशीष सोमपुरा...! त्यावेळी त्याच्या फी खूप वाटल्या होत्या... ते पैसे कसेंबसेच जमवले होते ह्यावेळी... पण त्याची माझी पहिल्या भेटीतच मैत्री झाली... मी नवीन होते तरी मला त्यानी कम्फर्टेबल केलं.. मुख्य म्हणजे तो त्याच्या मॉडेल्सला अतिशय आदराने वागवतो... ही त्याची मोठी क्वॉलिटी...ह्या फोटोशूट वर मी पुढे खूप काम केलं... खूप जाहिराती केल्या.... हे शूट खूप खास आहे माझ्यासाठी....चल आशिष, परत करूया असं एक मस्त फोटोशूट’, असं तिने या पोस्टमध्ये म्हंटलं आहे.

Web Title: Aai Kuthe Kay Karte Fem Actress Madhurani Prabhulkar Shared Her First Photo Shoot Memory

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..