Aai Kuthe Kay Karte: ईशा गेली पळून, अरुंधतीचा ताप वाढला, अनिरुद्धचा संताप..

आई कुठे काय करते मालिका रंजक वळणावर..
Aai Kuthe Kay Karte latest update isha wants marriage with anish arundhati aniruddha angry reaction
Aai Kuthe Kay Karte latest update isha wants marriage with anish arundhati aniruddha angry reactionsakal

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' मालिका बरीच चर्चेत आहे. कारण अखेर अरुंधतीचं आशुतोष सोबत लग्न होऊन ती संसाराला लागली आहे.

या लग्नात तिच्या पहिल्या नवऱ्याने अनेक विघ्न आणली. तिला शक्य त्या प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला. आता ती या सगळ्या त्रासातून सुटून आपल्या नव्या घरी गेली आहे. पण तिच्या मागचे दिव्य काही थांबता थांबेना..

(Aai Kuthe Kay Karte latest update isha wants marriage with anish arundhati aniruddha angry reaction)

Aai Kuthe Kay Karte latest update isha wants marriage with anish arundhati aniruddha angry reaction
jeetendra Birthday: 'या'अभिनेत्रीने धुडकावून लावला होता जितेंद्र यांचा लग्नाचा प्रस्ताव.. आणि मग..

एकीकडे आशुतोष आणि अरुंधतीचा संसार फुलत असतानाच अरुंधतीच्या मुलांची मात्र वाताहत होत आहे. यश आणि ईशा या दोघांच्याही आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली आहे.

यश आणि गौरी एकमेकांशी लग्न करणार होते. गौरीच्या आयुष्यात अनेक अडचणी असताना देखील यश ने गौरीचा स्वीकार केला आणि त्यांचा साखरपुडा झाला. नंतर गौरीने परदेशी जाण्याचा निर्णय घेतला.

त्यावेळी यशने तिला खूप अडवले पण ती करियर करायचं म्हणून निघून गेली. यश मात्र तिची वाट पाहत बसला. अरुंधतीच्या लग्नात ती परत आली पण तिने यशशी जुळवून घेण्या ऐवजी यशशी झालेला साखरपुडा मोडून निघून गेली. त्यामुळे यश कोसळला. त्याची समजून काढून आता कुठे अरुंधती सावरलेली असतानाच तिच्यावर पुन्हा आघात झाला आहे.

अरुंधतीची मुलगी इशा ही प्रेमात पडली आहे. आशुतोषचा पुतण्या अनिश हा तिचा प्रियकर आहे. म्हणूनच हे संबंध अनिरुद्धला मान्य नाही. शिवाय अनिशचे प्रेम असले तरी तो इतक्यात लग्नाला तयार नाही. त्यामुळे वैतागून एकटी पडलेली इशा घर सोडून जाते.

ती पळून जाते आणि अनिशला भेटते. तो तिची खूप समजूत काढतो. अरुंधतीच्या लक्षात येताच ति इशावर हात उचलते. मात्र इशा लग्नाबाबत ठाम असल्याने ती इशा आणि अनिशच्या साखरपुड्याचा प्रस्ताव घरच्यांपुढे मांडते. अनिरुद्ध मात्र याला विरोध करतो. त्यामुळे अरुंधतीची आता अधिकच कोंडी झाली आहे. नेमकं काय घडेल हे आता आगामी भागातच कळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com