आई कुठे काय करते: अरुंधतीने संजनाच्या लगावली कानशिलात

मालिकेत येणार धमाकेदार वळण
Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte

स्टार प्रवाहवरील Star Pravah लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'चं Aai Kuthe Kay Karte कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होत आहे. सध्या मालिकेत अनघा आणि अभिषेकच्या साखरपुड्याची धामधूम सुरु असताना संजनाच्या येण्याने आनंदात विरजण पडलं आहे. शुभकार्यात विघ्न आणण्याचा संजनाचा मनसुबा आहे. संजनाच्या या कारस्थानाविषयी कळताच अरुंधतीने माझ्या संसारात ढवळाढवळ केलीस मात्र माझ्या मुलांच्या वाटेला जायचं नाही असं म्हणत संजनाच्या कानशिलात लगावली आहे. (aai kuthe kay karte marathi serial upcoming episode updates)

अरुंधतीचं हे रौद्ररुप संजनासाठी नक्कीच धक्कादायक आहे. पण जेव्हा जेव्हा आपल्या मुलांच्या सुखाचा प्रश्न असतो तेव्हा आईची कसोटीही लागतेच. आजवर स्वत:चं दु:ख बाजूला ठेऊन अरुंधतीने मुलांच्या सुखाचाच विचार केला आहे. म्हणूनच मुलांच्या सुखाआड येऊ पाहणाऱ्या संजनाला अरुंधतीने खणखणीत उत्तर दिलं आहे.

हेही वाचा : 'टप्पू'च्या वडिलांचं निधन; 'गोगी'ची भावनिक कविता व्हायरल

अरुंधतीच्या या खणखणीत उत्तरावर संजनाची प्रतिक्रिया काय असणार हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. आई कुठे काय करते ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com