esakal | नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाने पोटगीमध्ये ३० कोटी रुपये आणि फ्लॅट्सची केली मागणी..
sakal

बोलून बातमी शोधा

aaliya nawazuddin

आलियाने पोटगी म्हणून नवाजुद्दीनकडे ३० कोटी रुपये आणि एका फ्लॅटची मागणी केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या सगळ्या प्रकरणावर आता आलियाने ट्वीटवर तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाने पोटगीमध्ये ३० कोटी रुपये आणि फ्लॅट्सची केली मागणी..

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई- बॉलीवूडचा स्टार नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या पत्नी आलियासोबतच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच आलियाने नवाजुद्दीनला घटस्फोटाची नोटीस बजावली होती. त्यातंच आता आलियाने पोटगी म्हणून नवाजुद्दीनकडे ३० कोटी रुपये आणि एका फ्लॅटची मागणी केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या सगळ्या प्रकरणावर आता आलियाने ट्वीटवर तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

हे ही वाचा: राज्यपाल कोश्यारींनी केलं सोनू सूदच्या कामाचं फोन करुन कौतुक, भेटण्याचीही व्यक्त केली इच्छा​

आलिया सिद्दीकीने मिडियामध्ये तिच्या घटस्फोटाबाबत पसरत असलेल्या चर्चांवर तिची प्रतिक्रिया दिली आहे. तीने दोन ट्वीट करत तिचं मत मांडलंय. आलियाने तिच्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटलंय, 'आता मला मिडीयामधून फोन यायला सुरुवात झाली आहे. माहिती मिळवण्यासाठी काल्पनिक प्रश्न विचारत आहेत. पत्रकारांनो, कृपया हे समजुन घ्या की गेल्या १० वर्षांपासून नवाजची सामाजिक प्रतिष्ठा आणि त्याचं नाव जपण्यासाठी मी गप्प राहिले. मी तेव्हा पर्यंत मौन पाळेन जोपर्यंत मला नवाज बोलण्यासाठी असहाय्य करत नाही.'

तर आलियाने तिच्या दुस-या ट्वीटमध्ये म्हटलंय, 'सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की जोपर्यंत मी माझ्या अधिकृत ट्वीटवर अकाऊंटवरुन एखादी गोष्ट स्विकारत अथवा नाकारत नाही तोपर्यंत मिडियामधील कोणीही काहीह केलेले आरोप खरे समजण्याच्या लायकीचे नाहीत.'

सोशल मिडियावरील आलियाचे हे दोन्ही ट्वीट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. याआधी देखील आलियाने नवाजुद्दीन सिद्दीकीशी संबंधित येणा-या चर्चांवर तिने ट्वीट केलं होतं. त्या ट्वीटमध्ये ती म्हणाली होती की, 'मी माझ्या मुलांसाठी स्वतःच्या पायावर उभं राहणं, स्पष्ट बोलणं आणि स्ट्राँग राहणं शिकली आहे. मी आजपर्यंत काहीही चुकीचं केलेलं नाही म्हणून मला कशाचीच परवा नाही. परंतु मी कोणा एका व्यक्तीला वाचवण्यासाठी स्वतःची इज्जत आणि चारित्र्य पणाला लावू शकत नाही. पैशांनी सत्य विकत घेतलं जावू शकत नाही. '

aaliya siddiqui demanding rs 30 crore as alimony from nawazuddin siddiqui

loading image
go to top