esakal | आमिरचा लाल सिंग वादाच्या भोवऱ्यात, चित्रिकरण स्थळावर केलं प्रदुषण
sakal

बोलून बातमी शोधा

aamir khan and kiran rao

आमिरचा लाल सिंग वादाच्या भोवऱ्यात, चित्रिकरण स्थळावर केलं प्रदुषण

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूड अभिनेता आमिर खान (bollywood actor aamir khan) हा गेल्या काही दिवसांपासून वादात अडकल्याचे दिसून आले आहे. त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे त्यानं आपल्या पत्नी किरण राव (kiran rao) पासून घेतलेला घटस्फोट. त्यानंतर आणखी पुन्हा एक वाद त्याच्या आगामी चित्रपटावरुन सुरु झाला आहे. त्या चित्रपटाचे नाव लाल सिंग चढ्ढा असे आहे. वास्तविक हा चित्रपट हॉलीवूडमधील फॉरेस्ट गंप (forest gump) या चित्रपटाचा हिंदीतील रिमेक आहे. ओरिजनल मुव्हीमध्ये प्रख्यात कलाकार टॉ़म हँक्सनं (tom hanks) प्रमुख भूमिका साकारली होती. हिंदीमध्ये ही भूमिका आमीरनं केली आहे. (aamir khan and laal singh chaddha team accused of spreading pollution in laddakh video)

लाल सिंग चढ्ढामध्ये आमिरबरोबर करिना कपूर (kareena kapoor) ही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची शुटिंग ही लडाखमध्ये सुरु आहे. मात्र आता त्याभागातील लोकांनी असा आरोप केला आहे की, चित्रपटाची टीम त्याठिकाणी प्रदुषण करत आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावरील एका युझर्सनं हा व्हिडिओ शेयर केला आहे. त्यात लडाखमधील वाखा गावांतील काही दृश्ये शेयर करण्यात आली आहेत.

हेही वाचा: 'हा तर मराठीतला रणवीर सिंग'; अभिजीतच्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस

हेही वाचा: सुयश ते शशांक; दुसऱ्यांदा प्रेमात पडले मराठी कलाकार

तो व्हिडिओ पाहिल्यानंतर असे दिसून येते की, गाड्यांनी होणारे प्रदुषण, प्लॅस्टिकच्या बॉटल्स, कचरा आणि अन्य सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले आहे. ट्विटरवर शेयर करण्यात आलेल्या त्या व्हिडिओला एक कॅप्शनही देण्यात आली आहे. त्यात असं म्हटलं आहे की, आमिर आणि त्याच्या त्या चित्रपटाच्या टीमसाठी हे मोठं गिफ्ट आहे. आमिर हा त्याच्या सत्यमेव जयते नावाच्या कार्यक्रमामध्ये मोठमोठ्या गप्पा करतो. मात्र प्रत्यक्षात कशी परिस्थिती काय आहे, याचे व्हिडिओ त्याला पाठवण्यात आले आहे.

loading image