esakal | 'हा तर मराठीतला रणवीर सिंग'; अभिजीतच्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

 Abhijit Khandkekar

'हा तर मराठीतला रणवीर सिंग'; अभिजीतच्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंग त्याच्या अतरंगी फॅशन सेन्समुळे ओळखला जातो. वेगवेगळ्या हटके लूकमधील फोटो तो सोशल मीडियावर शेअर करतो. त्याच्या काही लूकमुळे त्याला अनेकांनी ट्रोल देखील केले आहे. नुकताच मराठी मालिका आणि चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेता अभिजीत खांडकेकरने रणवीर सिंग सारखा अतरंगी लूक करून सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. अभिजीतच्या या फोटोला कमेंट करत अनेक नेटकऱ्यांनी त्याची तुलना रणवीर सिंग सोबत केली आहे.(marathi ranveer singh users comment on Abhijit Khandkekars new photo)

अभिजीत सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ तो नेहमी शेअर करतो. अभिजीतने नुकताच शेअर केलेल्या फोटोमध्ये हिरव्या रंगाचा प्लाजो आणि रंगीत जॅकेट घातले आहे. अभिजीतच्या या फोटोवर एकाने कमेंट केली, 'महाराष्ट्रीयन रणवीर सिंग', तर दुसरा युझर म्हणाला, 'हा मराठीतला रणवीर सिंग' अनेकांनी अभिजीतला अशा कमेंट केल्याने त्याची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा: Indian Idol 12: आशिष कुलकर्णी बाहेर, शण्मुखप्रिया पुन्हा ट्रोल

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये अभिजीतने गुरूनाथ ही भूमिका साकारली होती. या मालिकेमधील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. अभिजीतने अनेक मराठी शोचे सुत्रसंचालन केले आहे.

हेही वाचा: अजिंक्य देव यांनी बाजीप्रभू साकारण्यासाठी केसांना लावली कात्री

loading image