मुलीच्या साखरपुड्यात 'पापा कहते है..' म्हणत बेभान होऊन थिरकला आमिर, पहा व्हिडीओ...Aamir Khan Dancce video,daughter ira khan engagement | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aamir Khan Dance video from daughter ira khan engagement

Aamir Khan: मुलीच्या साखरपुड्यात 'पापा कहते है..' म्हणत बेभान होऊन थिरकला आमिर, पहा व्हिडीओ...

Aamir Khan: बॉलीवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टची स्वारी सध्या सातवे आसमानपर आहे. आणि का नसावी, अखेर त्याच्या मुलीचा म्हणजे आयरा खानचा बॉयफ्रेंड नुपुर शिखरेसोबत साखरपुडा एकदाचा पार पडला.आयरा आणि नुपुरच्या साखरपुड्याची पार्टी शुक्रवारी संध्याकाळी, १८ नोव्हेंबर रोजी पार पडली.

या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.आयरा खान ऑफ शोल्डर रेड गाऊनमध्ये भलतीच सुंदर दिसत होती. तर नुपूर शिखरेनं ब्लॅक टक्सीडो सूट परिधान केला होता. माहितीसाठी सांगतो की काही दिवस आधीच नुपूर शिखरेनं आयरा खानला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. त्याचे देखील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (Aamir Khan Dance video from daughter ira khan engagement)

हेही वाचा: Bigg Boss 16: शिव ठाकरेची बहिण मनिषा ठाकरे अचानक चर्चेत, बिग बॉसवर भडकत म्हणालीय,'नेहमीच काय...'

आता आमिर खानचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुलगी आयराच्या साखरपुड्यात 'पापा कहते है बडा नाम करेगा' या गाण्यावर तो चांगलाच थिरकताना दिसला. पार्टीत सामिल झालेल्या पाहुण्यांसमोर आमिरनं स्टेजवर हा धमाकेदार परफॉर्मन्स केला. त्याच्यासोबत आणखी एक माणूस आहे,ज्याला पकडून आमिर डान्स करताना दिसत आहे.

पांढऱ्या रंगाचा शिमरी पठाणी कुर्ता-पायजमा घातलेला आमिर एकदमच डॅशिंग दिसत आहे. पांढऱ्या दाढीचा लूक त्याच्यावर शोभून दिसतोय. मुलीच्या साखरपुड्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर उठून दिसत आहे. जेव्हा आमिर 'पापा कहते है बडा नाम करेगा..' वर डान्स करतोय तेव्हा आयरा खान त्याची चीअरलेडी बनली होती. हातात ड्रिंकचा ग्लास घेऊन आयरा देखील एन्जॉय करताना दिसत आहे वडीलांच्या डान्सवर.सोशल मीडियावर सध्या आमिरच्या या व्हिडीओला चाहत्यांनी डोक्यावर उचलून धरलेलं दिसतंय.

आयराआणि नुपुर शिखरेच्या जवळच्या सूत्राने सांगितले होते की दोघंही गेल्या काही वर्षापासून सोबत आहेत. त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि त्यांना आता आपल्या नात्याला नाव द्यायचे आहे. काही आठवडे आधीच दोघांनी साखरपुड्याचा निर्णय घेतला होता. एका खासगी सोहळ्यात दोघांचा साखरपुडा उरकला. यामध्ये दोन्ही कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा: Bigg Boss 16: शिव ठाकरेच नाही तर बहिण मनिषा ठाकरेही चर्चेत, बिग बॉसवर भडकत म्हणाली,'नेहमीच काय...'

आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत. त्यांच्या नात्याची सुरुवात २०२० पासून झाली. त्यानंतर दोघांनी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनचा पूर्ण काळ ते एकत्र राहिले. नुपूर आमिर खानचा ट्रेनर आहे.