Aamir Khan : लाल सिंह चड्ढामुळे आमिरला बसला धक्का; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

चित्रपट पाच दिवसांत केवळ ४८ कोटींची कमाई करू शकला आहे
Aamir Khan Latest News
Aamir Khan Latest NewsAamir Khan Latest News

Aamir Khan Latest News आमिर खान (Aamir Khan) जेव्हाही चित्रपट बनवतो तेव्हा तो मनापासून काम करतो. स्क्रिप्टिंगपासून ते दिग्दर्शन व गाण्यांपर्यंत प्रत्येक पैलूवर काम करतो. तो चित्रपटाच्या प्रमोशनच्या रणनीतीतही खूप हातभार लावतो. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटला जाणारा आमिर खान गेल्या काही काळापासून प्रेक्षकांची नाडी ओळखू शकलेला नाही. लाल सिंह चड्ढा अपयशी झाल्यानंतर आमिर खानला धक्का बसला आहे. यामुळे त्याने मोठा निर्णय घेतला आहे.

आमिर खान ठग्स ऑफ हिंदोस्तान फ्लॉप झाल्यानंतर लाल सिंग चड्ढा हा चित्रपट घेऊन आला. बराच वेळ घेऊन हा चित्रपट बनवला गेला. परंतु, हा चित्रपट प्रेक्षकांच्या कसोटीवर खरा उतरू शकला नाही. हॉलिवूड चित्रपट फॉरेस्ट गंपचे हक्क विकत घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यानंतर हा चित्रपट बनवताना खूप घाम गाळला. परंतु, हा चित्रपट पाच दिवसांत केवळ ४८ कोटींची कमाई करू शकला आहे.

Aamir Khan Latest News
Box Office Collection : लाल सिंग चड्ढाने वीकेंडला धरला वेग; मात्र...

आमिर खान (Aamir Khan) आणि माजी पत्नी किरण राव यांच्या जवळच्या मित्राने सांगितले की, आमिर खानला चित्रपट फ्लॉप झाल्याने मोठा धक्का बसला आहे. प्रेक्षकांनी लाल सिंह चड्ढाला नाकारल्याने आमिरवर वाईट परिणाम झाला आहे. त्याने हा चित्रपट मोठ्या जोमाने बनवला होता. इतकेच नाही तर चित्रपटाच्या अपयशाची जबाबदारी आमिरने घेतली आहे. यामुळेच वितरकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी पैसे परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

आमिर खानच्या अद्वैत चंदन दिग्दर्शित लाल सिंह चड्ढाने गुरुवारी ११.७ कोटी, शुक्रवारी ७.२६ कोटी, शनिवारी ९ कोटी, रविवारी १० कोटी आणि सोमवारी ८ ते ९ कोटींचा व्यवसाय केला. अशाप्रकारे या चित्रपटाने जवळपास ४७ कोटींचा व्यवसाय केला आहे. आमिर खानशिवाय या चित्रपटात करीना कपूर, मोना सिंग आणि नागा चैतन्य मुख्य भूमिकेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com