आमिरचा 'लाल सिंग चड्ढा' OTT वर, जाणून घ्या याविषयी सर्वकाही... Aamir Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aamir Khan Lal Singh Chaddha On OTT,inside details

आमिरचा 'लाल सिंग चड्ढा' OTT वर, जाणून घ्या याविषयी सर्वकाही...

आमिर खानचा(Aamir Khan) 'लाल सिंग चड्ढा'(Lal SIngh Chaddha) सिनेमाविषयी चाहत्यांमध्ये भलतीच उत्सुकता पहायला मिळते आहे. बॉलीवूडच्या परफेक्शनीस्टचा हा सिनेमा ११ ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे. आता ज्या लोकांना 'लाल सिंग चड्ढा'चा फर्स्ट डे,फर्स्ट शो पहायचाच आहे त्यांच्यासाठी गूड न्यूज आहे. चला सविस्तर जाणून घेऊया.(Aamir Khan Lal Singh Chaddha On OTT, inside details)

हेही वाचा: 64 खाणकामगारांना वाचवणाऱ्या इंजिनिअरच्या भूमिकेत अक्षय कुमार, Look Leaked

आमिर खानच्या चाहत्यांना हे ऐकून खूप आनंद होईल की थिएटर्समध्ये रिलीज होणारा लाल सिंग चड्ढा आता ओटीटी वर देखील रिलीज केला जाणार आहे. एका वेबसाईटला मिळालेल्या वृत्तानुसार निर्मात्यांनी सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर दोन महिन्यांंनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: 'RRR' सुपरस्टार रामचरणच्या पत्नीचा आई न होण्याचा निर्णय, कारणही केलं स्पष्ट

याचा अर्थ ऑक्टोबरमध्ये घरी बसल्या बसल्या आमिरचे चाहते त्याचा सिनेमा ओटीटीवर पाहू शकणार आहेत. आमिरचा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार हे तर ठरलंय.पण हे स्पष्ट झालं नाहीय की सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा' मध्ये त्याच्यासोबत करिन कपूरही दिसणार आहे. हॉलीवूडच्या 'फॉरेस्ट गम्प' या सिनेमाचा हा रीमेक आहे.

Web Title: Aamir Khan Lal Singh Chaddha On Ottinside

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..