अंतराळवीराच्या बायोपिकमध्ये आमीर 

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जून 2017

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्‍शनिस्ट म्हणजेच आमीर खान एका वर्षात एकच चित्रपट करतो. यंदाच्या वर्षी मात्र तो दोन सिनेमांत काम करतोय.

एक आहे त्याचा बहुचर्चित "ठग्स ऑफ हिंदुस्तान' आणि दुसरा आहे, भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यावर आधारित बायोपिक. सूत्रांच्या माहितीनुसार शर्मांवरील बायोपिकमध्ये आमीर, सिद्धार्थ रॉय कपूर व रॉनी स्क्रूवाला मुख्य भूमिकेत पाहायला मिळतील.

चित्रपटाचं नाव आहे, "सॅल्यूट'. "दंगल'नंतर आमीरचा तो दुसरा बायोपिक असेल. राकेश शर्मा यांची मुख्य भूमिका अर्थातच आमीर साकारणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, "सॅल्यूट' चित्रपट आमीरला मोठ्या स्तरावर बनवायचा आहे.

आता आमीर मुख्य रोलमध्ये आहे म्हटल्यावर त्याच्या मेहनतीबद्दल बोलायलाच नको. त्याने चित्रपटासाठी जोरदार तयारी सुरूही केलीय. आमीरला चित्रपटाच्या कास्टिंगपासून प्रत्येक कामात लक्ष द्यायचंय. चित्रपटाची निर्मिती करायचंही त्याने ठरवलंय. पुन्हा एकदा आमीरला बायोपिकमध्ये पाहण्यासाठी त्याचे चाहते नक्कीच उत्सुक असतील.  

Web Title: Aamir khan now in Astronaut biopic