एसीपी अजय पुन्हा साकारायला नक्कीच आवडेल - आमीर

रविवार, 15 ऑक्टोबर 2017

आता या चित्रपटाचा दिग्दर्शक सरफरोशचा दुसरा भाग लवकरच आणणार आहे. तशी घोषणाच त्याने काही दिवसांपूर्वी केली होती. आनंदाची बातमी अशी की साक्षात आमीर खाननेही त्याला दुजोरा दिला आहे. आज एका मुलाखतीत बोलताना तो म्हणाला, मला सरफरोशमधली राठोडची भूमिका पुन्हा करायला नक्की आवडेल. त्या भूमिकेकडे नव्याने पाहायची माझीही इच्छा आहे. आता हा योग नेमका कधी येतो ते बघू. पण हा सिनेमा मला करायला आवडेल.' 

मुंबई - 1999 मध्ये जाॅन मॅथ्यू मॅथन दिग्दर्शित सरफरोश आला होता. हा चित्रपट तुफान चालला. यातला अजय सिंग राठोड खूप गाजला होता. याशिवाय बाला ठाकूर.. त्याची कुंडली बनवणारा मिर्ची सेठ.. गझलनवाज मेहंदी गुलफाम हसन अशी सगळी पात्रं त्यावेळी तुफान हिट झाली होती. पुढे हा चित्रपट टीव्हीवर आला तेव्हाही त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. सरफरोश पुन्हा पुन्हा पाहणाराही एक वर्ग आहे. आमीर खान, सोनाली बेद्रे, नासिरूद्दीन शाह, मनोज जोशी आदींच्या भूमिका गाजल्या.

आता या चित्रपटाचा दिग्दर्शक सरफरोशचा दुसरा भाग लवकरच आणणार आहे. तशी घोषणाच त्याने काही दिवसांपूर्वी केली होती. आनंदाची बातमी अशी की साक्षात आमीर खाननेही त्याला दुजोरा दिला आहे. आज एका मुलाखतीत बोलताना तो म्हणाला, मला सरफरोशमधली राठोडची भूमिका पुन्हा करायला नक्की आवडेल. त्या भूमिकेकडे नव्याने पाहायची माझीही इच्छा आहे. आता हा योग नेमका कधी येतो ते बघू. पण हा सिनेमा मला करायला आवडेल.' 

या चित्रपटात सोनाली बेंद्रे आणि नसीरूद्दीन शाह यांच्याही भूमिका असणार आहेत असं कळतं. 

Web Title: aamir khan would love to do sarfarosh again esakal news