esakal | 'आमना, रमजान होईपर्यत तरी कपडे घाल...'
sakal

बोलून बातमी शोधा

aamna sharif

'रमजान होईपर्यत तरी कपडे घाल...'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - छोट्या पडद्यावरील अभिनेत्री म्हणून ओळख असणारी अभिनेत्री म्हणून आमना शरीफ (Aamna Sharif) सर्वांना परिचित आहे. मात्र सध्या चर्चेत आली आहे त्याचे कारण म्हणजे तिनं सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो. यामुळे तिला चाहत्यांच्या टीकेला सामोरं जावं लागलं आहे. अनेकांनी तिच्या फोटोंचे कौतूकही केले आहे. दुसरीकडे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. रमजानच्या महिन्यात अशाप्रकारचे फोटो ती कसे काय शेअर करु शकते असा प्रश्न तिला नेटक-यांनी विचारला आहे. कही तो होगा मालिकेतील अभिनेत्री म्हणून आमनाची लोकप्रियता मोठी आहे.

बॉलीवूडमधील सेलिब्रेटींना जेवढी लोकप्रियता मिळते तेवढीच ती छोट्या पडद्यावरील कलाकारांनाही मिळत असल्याचे दिसून आले आहे. अभिनेत्री आमनानं (Aamna Sharif) सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे तिच्या नावाची चर्चा आहे. तिचं ते वेगळं रुप काहींच्या आवडीचा विषय झाले आहे तर काहींनी तिला नावं ठेवण्यास सुरुवात केली आहे.

आमना जे फोटो प्रसिध्द झाले आहेत त्यात तिनं स्ट्रिप्ट शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. तिनं गळ्यात सोन्याची चैनही घातली आहे. त्या तुलनेत तिनं कमी मेक अप केला आहे. तिचा हा बोल्ड अंदाज फॅन्सला आवडलेला नाही. त्यातच तिनं रमजानच्या महिन्यात अशाप्रकारचा लूक करणं अनेकांचा राग ओढावून घेतला आहे.

Amana Sharif

Amana Sharif

हेही वाचा: 'छिछोरे'मधील अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे कोरोनाने निधन

ज्यावेळी तिच्या चाहत्यांनी हे फोटो पाहिले त्यावेळी त्यांनी तिला धर्माबाबत अनेक गोष्टी सुनावल्या आहेत. रमजान महिन्याचे पावित्र्य काय आहे, ते कसे जपले पाहिजे याविषयीही तिला सांगण्यात आले आहे. एका युझर्सनं तिला कमेंट देताना म्हटलं आहे की, रमजानचा महिना सुरु आहे. त्यामुळे किमान या ३० दिवसांत तरी तिनं कपडे घालावेत. आणखी दुस-या नेटक-यांनी लिहिलं आहे की, रोजा आणि रमजानच्या महिन्यात किमान अशा पोस्ट शेअर करु नकोस.