Abdu Rozik: तोंडात घातलं कच्चं अंड, वरुन मीठही! बिग बॉसच्या घरात राडा

टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये ज्या रियॅलिटी शो नं प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे त्या बिग बॉसमध्ये सध्या राडा सुरु झाला आहे.
Abdu Rozik
Abdu Rozikesakal

Abdu Rozik Bigg Boss 16 tv entertainment : टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये ज्या रियॅलिटी शो नं प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे त्या बिग बॉसमध्ये सध्या राडा सुरु झाला आहे. कोणत्याही कारणावरुन एकमेकांना डिवचण्यात धन्यता मानणाऱ्या बिग बॉसच्या घरात सगळं काही आलबेल नाही. स्पर्धक कमालीचे आक्रमक झाले आहेत. मात्र यासगळ्यात काहींना त्याचा तोटाही सहन करावा लागतो आहे.

बिचारा अब्दु रोझिक यंदाच्या सीझनमध्ये अनेकांच्या रडारवर आहे. कित्येकांनी त्याला पाण्यात पाहण्याचा प्रयत्न केला आहे. यंदाच्या सीझनमध्ये सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धक म्हणून अब्दुरच्या नावाचा समावेश करावा लागेल. त्याला चाहत्यांकडून मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. तो एका घटनेमुळे भलताच चर्चेत आला आहे. त्याच्यावर सूड उगवण्याचा काही जणांनी प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे.

त्याचं झालं असं की, बिग बॉसनं घरातील स्पर्धकांना एक टास्क दिला होता. मात्र त्या दरम्यान अब्दुसोबत जे झालं त्यामुळे त्याच्याबाजुनं नेटकऱ्यांनी बाकीच्या स्पर्धकांना धारेवर धरलं आहे. अब्दुला रागाच्या भरात चक्क कच्च अंडच आणि मीठ खाऊ घातल्यानं नेटकऱ्यांचा संताप झाला आहे. त्यावरुन अनेकांनी ज्यांनी अब्दुला त्रास दिला आहे त्यांना बिग बॉसनं दया दाखवू नये. अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.

Abdu Rozik
Shreya Ghoshal: श्रेया घोषालचा आवाज गेला? पोस्टनं चाहत्यांना बसला धक्का

सध्या बिग बॉसचे घर साजिद खान चालवत आहे. त्यामुळे घरात वेगळेच वातावरण आहे. दरवेळी कॅप्टन बदलतो. यावेळी साजिद खान आहे. सुरुवातीपासूनच तो या शो मध्ये नसावा अशी भूमिका नेटकऱ्यांनी घेतली होती. बिग बॉसमध्ये साजिदला थारा नको. असे नेटकरी म्हणत होते. सलमान खानला देखील काहींनी गळ घातली होती. मात्र साजिद आता कॅप्टन झाला असून त्यानं आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे.

Abdu Rozik
Video Viral: जामिनावर सुटलेल्या गुंडाची जंगी मिरवणूक; पोलिसांना थांगपत्ता नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com