Abdu Rozik ला भारत आवडला.. आता कायमचं इथे येऊन मुंबईत करणार हि खास गोष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

abdu rozik, abdu rozik bb16, abdu rozik restaurant

Abdu Rozik ला भारत आवडला.. आता कायमचं इथे येऊन मुंबईत करणार हि खास गोष्ट

Abdu Rozik News: बिग बॉस १६ (Bigg Boss 16) मधून अब्दू रोझीक प्रचंड लोकप्रिय झाला. अब्दू आणि शिवची खास मैत्री सुद्धा चर्चेत राहिली. अब्दू अजूनही भारतात असून तो लवकरच त्याच्या मायदेशी म्हणजेच कझाकिस्तानाला परत जाणार आहे.

अब्दू भारतात सध्या राहण्याची पूर्ण मजा घेतोय. तो बिग बॉस मधल्या मित्रांसोबत मजेत वेळ घालवत आहे. आता लवकरच अब्दू भारतात एक खास गोष्ट करण्याच्या तयारीत आहे.

आता शोमधून बाहेर आल्यानंतर अब्दू रोजिकने भारतात पहिले रेस्टॉरंट उघडण्याची घोषणा केली आहे. एका सुप्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफरने त्याच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवर अब्दू रोजिकचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

अब्दू मुंबई विमानतळावर स्पॉट झाला आहे. व्हिडिओमध्ये पापाराझींशी बोलताना अब्दू रोजिक सांगतो की, तो लवकरच भारतात आपले रेस्टॉरंट उघडणार आहे.

व्हिडिओमध्ये तो म्हणतो, ‘मी लवकरच भारतात माझे रेस्टॉरंट उघडणार आहे. मी 6 मार्च रोजी भारतात परत येईन आणि मुंबईत माझे रेस्टॉरंट उघडणार आहे. असं अब्दू म्हणाला.

अब्दू रोजिकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिग बॉस 16 मध्ये अब्दू रोजिक, साजिद खानची, शिव ठाकरेची मैत्री खूप गाजली होती. अब्दू रोजिक घराबाहेर गेल्यावर साजिद - शिव खूप रडले होते.

बिग बॉस १६ संपल्यावर अब्दू रोझीक त्याच्या मंडलीसोबत एकत्र धम्माल करताना दिसला. आता अब्दू मुंबईत स्वतःचं हॉटेल उघडत असल्याने सर्वांनाच आनंद झालाय.

काही दिवसांपूर्वी अब्दूने एक खास गोष्ट केली होती. अब्दु रोजिक हा सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा फॅन आहे.

रविवारी, अब्दूने त्याच्या चाहत्यांसह आणि पापाराझींनी शाहरुखचा सुपरहिट चित्रपट 'पठाण' पाहण्यासाठी संपूर्ण थिएटर बुक केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

याशिवाय अब्दू बिग बॉस नंतर त्याच्या गाडीने शाहरुख खानच्या घराजवळ म्हणजेच मन्नत जवळ जाऊन त्याने शाहरुखला शुभेच्छा दिल्या. अब्दूला पाहण्यासाठी त्याच्या फॅन्सची मोठी गर्दी झाली होती.

टॅग्स :Marathi News Bollywood