अभिमान..! RRR ठरला जगातला सर्वोत्कृष्ट सिनेमा, Hollywood मध्ये पुन्हा भारतीय सिनेमाचा डंका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RRR, HCA Awards 2023, Natu Natu, SS Rajamaouli

अभिमान..! RRR ठरला जगातला सर्वोत्कृष्ट सिनेमा, Hollywood मध्ये पुन्हा भारतीय सिनेमाचा डंका

RRR Latest News: राजमौली यांचा RRR जगात भारी सिनेमा ठरलाय. नुकतीच हॉलिवूड क्रिटिक असोसिएशन अवॉर्ड्स २०२३ (HCA Film Awards) ची घोषणा झाली. हा पुरस्कार सोहळा जगातला मानाचा पुरस्कार सोहळा मानला जातो.

या पुरस्कार सोहळ्यात RRR ने विविध पुरस्कार सोहळ्यात स्वतःचं नाव कोरलं आहे. RRR ला सर्वोत्कृष्ट आंतराराष्ट्रीय सिनेमा म्हणून पुरस्कार मिळाला आहे.

याशिवाय बेस्ट ऍक्शन सिनेमा म्हणून RRR ने पुरस्कार पटकावला आहे. RRR चे दिग्दर्शक एस. एस. राजामौली ( SS Rajamouli) यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे. याशिवाय RRR नाटू नाटू गाण्यासाठी बेस्ट सॉंग आणि बेस्टस्टंट असा पुरस्कार मिळाला आहे.

(RRR became the best movie in the world wins HCA Awards 2023)

Jr NTR आणि राम चरण यांच्या अभिनयाने सजलेला RRR हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली आहे. ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळ्याआधी RRR ला हा मोठा सन्मान मिळाला आहे.

RRR च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. RRR निमित्ताने भारतीय सिनेमांचा डंका हॉलिवूडमध्ये गाजतोय

RRR हा एक पीरियड ड्रामा आहे ज्यात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण अनुक्रमे आदिवासी नेता कोमाराम भीम आणि क्रांतिकारक अल्लुरी सीता रामा राजू यांच्या भूमिकेत आहेत.

स्वातंत्र्यपूर्व भारतातील RRR सिनेमातली काल्पनिक कथा या दोघांच्या मैत्रीचा शोध घेते आणि दडपशाहीविरुद्धच्या त्यांच्या लढ्यावर प्रकाश टाकते.

RRR सिनेमातून आलिया भटचे टॉलीवूडमध्ये पदार्पण झाले. याशिवाय अजय देवगण, श्रिया सरन, समुथिरकणी, रे स्टीव्हनसन, मकरंद देशपांडे आणि ऑलिव्हिया मॉरिस अशा कलाकारांनी RRR सिनेमात महत्वाची भूमिका साकारली.

संगीतकार एमएम कीरावानी यांनी RRR ला संगीत दिले आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात कीरावानी यांनी संगीतबद्ध केलेल्या नाटू नाटू गाण्याला नॉमिनेशन मिळाले आहे. त्यामुळे RRR ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बाजी मारणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.

टॅग्स :Marathi News Bollywood