Abhay Deol Insta Post : 'बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये १९ वर्ष पूर्ण झाली पण अजूनही....' अभयच्या मनात कोणती खंत?

सोचा ना था नावाच्या चित्रपटातून अभयनं (Abhay Deol Insta Post) डेब्यू केलं होतं. आता त्यानं एक खास पोस्ट शेयर केली असून त्याची चर्चा होत आहे.
Abhay Deol Latest News
Abhay Deol Latest Newsesakal

Abhay Deol Insta Post Viral : प्रसिद्ध अभिनेता अभय देओल हा नेहमीच त्याच्या हटके स्टाईलमुळे चर्चेत राहिलेला सेलिब्रेटी आहे. त्यानं २००५ मध्ये सोचा ना था मधून इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं होतं. आता त्यानं इंस्टावर एक (Latest Bollywood News) खास पोस्ट शेयर करुन चाहत्यांना आगळं वेगळं सरप्राईज दिलं आहे.

ती गोष्ट काही केल्या केली नाही...

अभय त्याच्या पोस्टमध्ये म्हणतो की, मी कधीही जाहिरातींच्या पाठीमागे पळालो नाही. स्वताला त्यांचा ब्रँड म्हणवू दिले नाही. त्याबाबत काही (Abhay Deol Viral News) गोष्टींची काळजी घेतली. १९ वर्षांपूर्वी सोचा ना था नावाच्या चित्रपटातून डेब्यू करणाऱ्या अभयनं जाहिरातबाजीवर तीव्र शब्दांत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी समोर येणाऱ्या बाजारपेठेला कधी बळी पडलो नाही.

आपल्याला जाहिरातबाजी आणि ब्रँडिंगपासून दूर राहायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवली. पीआरच्या रुपानं कधीही स्वताला ब्रँड म्हणून समोर आणले नाही. ही गोष्ट मला महत्वाची वाटते. असेही अभयनं यावेळी सांगितले.

पण मी खूप आनंदी अन् समाधानी आहे..

मला माहिती आहे की माझा बॉलीवूडमधील प्रवास हा १९ वर्षांचा झाला आहे. पण आतापर्यतचा जो प्रवास आहे तो खूपच आनंदी आणि समाधान करणारा आहे. खूप काही शिकायला मिळाले. मी ज्या चित्रपटांची निवड केली ती एक ब्रँड म्हणूनच समोर आले. मला माझ्या निवडीचं कौतुक आहे. मी नेहमीच माझ्या मनाचं ऐकलं. त्यातून काही धडेही घेतले. त्यामुळे मी अजुनही कोणतीही तक्रार न करता आनंदी आहे.

अभयकडे अजुनही त्या गोष्टीची कमतरता....

अभयला बॉलीवूडमध्ये दीड दशकांहून अधिक काळ झाला आहे. अशावेळी त्यानं त्याच्या पोस्टमधून काही महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये तो म्हणतो की, मला अजुनही बऱ्याचशा बाबींची खंत आहे. जसं की माझी खूप इच्छा होती माझा स्वतंत्र असा स्टायलिस्ट असावा. पण ते अजनुही काही शक्य झालेलं नाही. माझं दिसणं हे अजुनही सत्तरीतल्या त्या काळातल्या चित्रपटांसारखं आहे. असं अभयनं म्हटलं आहे.

Abhay Deol Latest News
Rajnikanth On Anant Radhika Pre Wedding : 'अंबानींच्या लेकाचं प्री वेडिंग म्हणजे साक्षात...' सुपरस्टार रजनीकांत काय म्हणाले?

सोचा ना था नावाच्या चित्रपटातून अभयनं डेब्यू केलं होतं. त्याचा हा चित्रपट युवा वर्गात खूपच लोकप्रिय झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यात त्याच्यासोबत आयशा टाकिया आणि अपूर्वा झा नावाच्या अभिनेत्रींनी स्क्रीन शेयर केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com