Abhijeet Bichukale : कसा झाला अपघात? स्वतःच दिली तब्येतीची अपडेट

अभिजित बिचुकले आणि त्यांच्या चार मित्रांचा पुण्यात अपघात झाला होता.
Abhijeet Bichukale
Abhijeet BichukaleSakal

बिग बॉस फेम अभिजित बिचुकले याचा काल पुण्यात अपघात झाला. या अपघातानंतर अभिजितने स्वतःच आपल्या तब्येतीबद्दल माहिती दिली आहे. तसंच अपघाताचीही माहिती दिली आहे.

अभिजित म्हणाला, "माझा एक किरकोळ अपघात झाला आहे, जेव्हा मी मित्रांसोबत गेलो होतो. पण कुठूनतरी अफवा पसरली की माझा मोठा अपघात झाला आहे. गंभीर दुखापत झाली आहे. पण तसं काही नाहीये. मी सध्या घरीच विश्रांती घेत आहे. माझ्या खासगी डॉक्टरांच्या सल्ल्याने आराम करत आहे आणि लवकरच सगळ्या चाहत्यांसाठी व समाजकार्यासाठी मी बाहेर येतोय."

Abhijeet Bichukale
Abhijeet Bichukale : "माझ्या पत्नीला महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री करणार"

अभिजित काही कामानिमित्त पुण्यात आला होता. त्यावेळी त्याच्यासह त्याच्या चार मित्रांचा अपघात झाला. या अपघातामध्ये अभिजितच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्याच्यावर सध्या घरीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू आहेत. चाहत्यांनी अभिजितला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com