आर्मी ऑफिसरचा रोल करायचाय! : अभिजित खांडकेकर (रॅपिड फायर)

तन्मयी मेहेंदळे
गुरुवार, 15 जून 2017

दिवसाची सुरवात कशी करतोस? 
- ग्रीन टी किंवा चहा पिऊन आणि दररोजच्या व्यायामाने मी दिवसाची सुरवात करतो. 

फिटनेस फंडा काय आहे? 
- पौष्टिक आहार आणि नियमित व्यायाम! 

रिकाम्या वेळात काय करतोस? 
- वैविध्यपूर्ण चित्रपट बघतो आणि वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं वाचतो. 

दिवसाची सुरवात कशी करतोस? 
- ग्रीन टी किंवा चहा पिऊन आणि दररोजच्या व्यायामाने मी दिवसाची सुरवात करतो. 

फिटनेस फंडा काय आहे? 
- पौष्टिक आहार आणि नियमित व्यायाम! 

रिकाम्या वेळात काय करतोस? 
- वैविध्यपूर्ण चित्रपट बघतो आणि वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं वाचतो. 

अभिनेता झाला नसतास, तर काय व्हायला आवडलं असतं? 
- आर्मी ऑफिसर झालो असतो. 

तुझा ड्रीम रोल? 
- मला आर्मीमध्ये जायचं होतं, त्यामुळं आर्मी ऑफिसरचा रोल करायला नक्की आवडंल. 

बायकोच्या हातची आवडीची डिश? 
- सुखदा चकोल्या खूप छान करते, त्या आवडतात. 

कधीही ऐकावीशी वाटणारी गाणी? 
- "माझे माहेर पंढरी..' आणि "इंद्रायणी काठी..' मी नेहमी ऐकतो. 

बॉलिवूडमधील आवडता सिनेमा? 
- "लक्ष्य' आणि "जिंदगी ना मिलेगी दोबारा'. 

बदल करायची संधी मिळाल्यास अभिनय क्षेत्रात काय बदल करू इच्छितो? 
- कार्यक्रमांच्या, कामांच्या निमित्तानं परदेशात फिरणं होतं. तिकडच्याप्रमाणं थिएटर्स, लाइट आणि साउंड सिस्टिम आपल्याकडं आणण्याचा प्रयत्न करेन. 

या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना काय सांगशील? 
- स्ट्रगल आहेच. मेहनत करीत राहा, प्रसिद्धी आणि यश हे दोन्ही वेगळे आहेत. आपलं काम आपण प्रामाणिकपणे करत राहावं. 
 

Web Title: abhijeet khandkekar interview