esakal | अभिजीत पवारच्या 'द नोशन ऑफ आईज' या शॉर्टफिल्मची सातासमुद्रापार चर्चा

बोलून बातमी शोधा

director abhijeet pawar

अभिजीत पवारच्या 'द नोशन ऑफ आईज' या शॉर्टफिल्मची सातासमुद्रापार चर्चा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

दिग्दर्शक अभिजीत मारुती पवार यांच्या 'द नोशन ऑफ आईज' या शॉर्ट फिल्मने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बाजी मारली आहे. बऱ्याच देशांच्या चित्रपट महोत्सवात या शॉर्टफिल्मने विजेतेपद पटकावले. 'पोर्ट ब्लेअर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२१' चा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार या शोर्टफिल्मने पटकावला आहे. 'वर्ल्ड फिल्मकार्निव्हल सिंगापूर २०२१' चा आऊटस्टँडिंग अचिव्हमेंट अवार्ड 'द नोशन ऑफ आईज' हा पुरस्कार या शॉर्टफिल्मला घोषित झाला.

'ड्रूक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल भूतान २०२१' आणि 'इंडो फ्रेंच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२१' चे विजेतेपदही या शॉर्टफिल्मला मिळाले. याशिवाय बेस्ट इंडियन शॉर्टफिल्म म्हणून 'गोल्डन स्पॅरो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२१' आणि आऊटस्टँडिंग फिल्म म्हणून 'टागोर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२१' चा मान या शॉर्टफिल्मने पटकावला. ही शॉर्ट फिल्म इंग्रजी भाषेमध्ये आहे. या शॉर्ट फिल्मची निर्मिती 'स्क्रीन स्टोरी २४ प्रोडक्शन' या प्रोडक्शन हाऊसने केली आहे. तर शॉर्ट फिल्मची कथा रोहित एस यांने लिहीली आहे. या लघुपटातून देवेश शर्मा, मानसी पाटील, धारा चांदोरकर, भावना कासू, समीर शेख इत्यादी कलाकारांने काम केले आहे.

हेही वाचा : सुबोध-तेजस्विनीची जोडी पुन्हा एकत्र

या शॉर्ट फिल्मबाबत दिग्दर्शक अभिजीत मारुती पवार यांनी सांगितले, "या शॉर्टफिल्मची कथा मला माझ्या बेंग्लोरच्या रोहित या मित्राकडून मिळाली, स्क्रिप्ट वाचताच मी खूप प्रभावित झालो आणि स्क्रिप्ट वाचता वाचताच माझ्या डोक्यात कल्पनाशक्ती निर्माण होत गेली. बऱ्याच लोकांनी मला ही शॉर्ट फिल्म करणं फार कठीण आहे असे सुचवले. मात्र माझ्या स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावर मी ही शॉर्ट फिल्म करण्याचे धाडस केले. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत कोरोनाकाळात या शॉर्ट फिल्मचे शूटिंग झाले आणि याचे फळ म्हणून आज ही शॉर्ट फिल्म आंतरराष्ट्रीय पुरस्कारात विजेतेपद पटकावत आहे. मी माझ्या संपूर्ण टीमलाही धन्यवाद देऊ इच्छितो की आज त्यांच्यामुळे हे यश संपादन करता आले".