
Abhijit Panse यांना शिंदे गटाकडून ऑफर? फिरणार का ठाण्यातील राजकारणाची सूत्र?...
Abhijit Panse: अभिजित पानसे हे सध्या राजकारण आणि मनोरंजन अशा दोन्ही क्षेत्रात चर्चेत असलेलं नाव. राजकारणात पहिल्यापासूनच सक्रिय असलेल्या अभिजित पानसेंनी मनोंरजन क्षेत्रात एन्ट्री केल्यावर तिथेही 'रेगे' या आपल्या पहिल्या सिनेमामुळे सगळ्यांनाच एक दिग्दर्शक म्हणून आपली दखल घ्यायला भाग पाडलं.
पुढे 'ठाकरे' या त्यांच्या सिनेमानं तर परखड भूमिका ठामपणे मांडणारा उत्तम दिग्दर्शक म्हणून त्यांना इंडस्ट्रीत नवी ओळख मिळाली आणि त्याच्या 'रानबाजार' वेबसिरीजनं तर सिनेसृष्टीतच नाही तर प्रेक्षकांमध्येही आपला असा एक चाहता वर्ग निर्माण केला.
आपल्या सिनेमांमुळे अनेकदा चर्चेत येणारे पानसे सध्या चर्चेत आले आहेत ते राजकारणावरील त्यांच्या काही खास मतांमुळे. (Abhijit Panse On Maharashtra Politics offer from shinde group patla tar ghya show)
प्लॅनेट मराठीवर सध्या 'पटलं तर घ्या' हा सेलिब्रिटी चॅट शो नुकताच सुरु झाला आहे. प्रेक्षकांना हा शो या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विनामुल्य पहाता येणार आहे. सध्या या शो चा एक प्रोमो जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये होस्ट जयंती वाघधरे पानसेंना एका राऊंड अंतर्गत झटपट प्रश्न विचारताना दिसत आहे. प्रश्नांची रेलगाडी सुरु असतानाच अचानक गाडी थांंबते ती राजकीय प्रश्नावर...पानसेही उत्तर देताना थोडं अडखळलेले दिसत आहेत..अर्थात होस्टनं प्रश्नच तसा विचारला आहे.
आपल्या सर्वांनाच माहित आहे अभिजित पानसे सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत कार्यरत आहेत. ठाण्यातले मनसेचे सक्रिय नेता...कार्यकर्ता..त्यामुळे जेव्हा पटलं तर घ्या या शो मध्ये होस्ट पानसेंना विचारते, 'आम्ही असं ऐकलंय की तुम्हाला शिंदे गटाकडून ऑफर आहे?', ते ऐकून पानसेंचं उत्तर ऐकण्यास जो तो उत्सुक असणार हे नवीन सांगायला नको. सध्या या भागाचा प्रोमो व्हायरल होत आहे. पण पानसेंनीही डिप्लोमॅटिक उत्तर देत प्रश्न टोलावून लावला असणार हे वेगळं सांगायला नको.
पण असं असलं तरी आता खरंच पानसेंना शिंदे गटाकडून ऑफर आहे का?आणि त्यामुळे ठाण्यातील राजकारणाची सूत्र फिरतील का? अशा चर्चेला मात्र जोरदार उधाण आलं आहे.