Mahesh Manjrekar यांच्या विरोधात नागपूरात लहू सेना आक्रमक..मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी..काय आहे प्रकरण? CM Eknath Shinde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahesh Manjrekar & CM Eknath Shinde

Mahesh Manjrekar यांच्या विरोधात नागपूरात लहू सेना आक्रमक..मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी..काय आहे प्रकरण?

Mahesh Manjrekar: गेल्या काही दिवसांपासून महेश मांजरेकर आपल्या एका वेबसिरीजमुळे वादग्रस्त चर्चेत पडलेले आहेत. ही वेबसिरीज एका खाजगी वाहिनीवर प्रसारित केली जाते. या वेबसिरीजमधील एका लग्न सोहळ्यातील सीन मध्ये महेश मांजरेकर बॅण्ड पथकातील सदस्यांविषयी आक्षेपार्ह्य संवाद बोलताना दिसत आहेत. आणि यामुळे बॅण्ड पथकात वाद्य वाजवून आपल्या पोटाची खळगी भरणाऱ्या कलाकारांचा अपमान झाला आहे अशी ओरड गेल्या काही दिवसांपासून उठताना दिसत आहे.

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या विरोधात लहू सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून निवेदन पाठविले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (Mahesh Manjrekar lahu sena demand to cm eknath shinde to take action against director nagpur)

बॅण्ड पथकार वाद्य वाजवणं हा एक व्यवसाय आहे खरंतर. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशी बॅण्ड पथकं पहायला मिळतात. लग्न समारंभ असो किंवा गणपती सारखा उत्सव किंवा इतर काही सोहळे यामध्ये या बॅण्ड पथकांना मोठी मागणी असते.

मात्र मांजरेकरांच्या या वेबसिरीजमधील सीनमध्ये बॅण्ड पथकाच्या संदर्भात असलेले संवाद महाराष्ट्रातील त्या अनेक कलाकारांना कमी लेखण्याचा प्रयत्न करताना दित आहेत असा आरोप होताना दिसत आहे.

लहू सेनेचे प्रमुख संजय कठाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात आरोप करण्यासोबतच मांजरेकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. उपजिल्हाधिकारी श्रीमती बनकर यांना हे निवेदन देण्यात आले आहे.