
या कारणामुळे अनेक चित्रपट हातचे गमावले असल्याचे देखील अभिषेकने यावेळी सांगीतले.
मुंबई: अभिनेता अभिषेक बच्चन हा लवकरच ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणाऱ्या ब्रीदः इनटू द शॅडोज या वेब सिरीजच्या माध्यमातून डिजीटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. अभिषेकने त्याच्या पहिल्या वेब सिरीजचे पहिले पोस्टर नुकतेच प्रसिध्द केले आहे. यादरम्यान त्याने पत्रकार राजीव मसांद यांना दिलेल्या मुलाखतीत चित्रपटांमध्ये बोल्ड सीन न करण्यामागच्या कारणांचा खुलासा केला आहे.
अपारशक्ती खुरानाने दाखवली झलक, कोरोनानंतर असे शूट होतील रोमँटीक सीन...
एका मासिकाने दिलेल्या बातमीनुसार अभिषेकला वडिल बनल्यानंतर आयुष्यात काय बदल झालेत असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना अभिषेकने सांगीतले की, “या मध्ये एक गोष्ट नक्कीच बदलली आहे ती म्हणजे काही सीन करताना मला असहज वाटायला लागले आहे, मुलगी आराध्याला आवडणार नाहीत आणि ती मला प्रश्न विचारेल इथे नेमकं काय सुरु आहे.”
जेव्हा स्मृती इराणींनी केला होता रॅम्प वॉक, मिस इंडिया स्पर्धेचा व्हिडिओ व्हायरल
अभिषेक बच्चनने पुढे सांगीतले की तो दिग्दर्शक चित्रपट साईन करण्या अगोदरच इंटिमेट सीन करण्यास तयार नसल्याचे सांगतो, तुमच्याकडे इतर पर्याय उपलब्ध आहेत. अभिषेकने सांगीतले की त्याच्या या इंटिमेट सीन न करण्यामुळे त्याने अनेक चित्रपट देखील गमावले आहेत. तरी घेतलेल्या निर्णयाबद्दल कसलीही खंत वाटत नाही. अभिषेक म्हणाला की अशा वेळी मी वेगळ्या पध्दतीने विचार करतो आणि दिग्दर्शक वेगळे विचार ठेवतात, मी त्यांच्या मतांचा पुर्णपणे आदर करतो. अभिषेक बच्चान याची वेब सीरीज 10 जूलै रोजी अमेझॉन प्राईम व्हिडीओ या माध्यमावर प्रदर्शित होणार आहे, या सीरीज मध्ये अभिषेक पुन्हा एकदा सिनीअर इंस्पेक्टर कबीर सावंत ही भूमिका करताना दिसणार आहे. त्याच्यासोबत नित्या मेनन आणि सयामी खेर देखील दिसणार आहेत.