२८ दिवसांनंतर अभिषेक बच्चनचा कोरोना रिपोर्ट आला निगेटीव्ह

abhishek bachchan
abhishek bachchan
Updated on

मुंबई- बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जवळपास २८ दिवसांनंतर अभिषेकचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. अभिषेकने स्वतः याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आता संपूर्ण बच्चन कुटुंबिय कोरोना निगेटीव्ह झालं आहे. 

अभिषेक बच्चनने ट्विट करत म्हटलं आहे, 'वचन तर वचन असतं. आज दुपारी माझ्या कोरोना टेस्टचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की मी याला हरवेन. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद. नानावटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आणि नर्सिंग स्टाफने जे काही सहकार्य केलं त्यांचे मनापासून आभार. धन्यवाद.' 

अभिषेक बच्चन ११ जुलैच्या संध्याकाळी नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत त्याला २८ दिवस झाले आहेत. २८ दिवसांनंतर अभिषेक बच्चनला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळत आहे. अभिषेक बच्चन सोशल मिडियावर सतत त्याच्या आरोग्याबाबतीचे अपडेट शेअर करत होता. अभिषेकच्या आधी २ ऑगस्टला अमिताभ बच्चन कोरोना निगेटीव्ह झाल्यावर त्यांच्या घरी पोहोचले होते.  

अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन ११ जुलैला कोरोना पॉझिटीव्ह आले होते. ज्यानंतर दोघेही नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. तर १७ जुलै रोजी ऐश्वर्या आणि आराध्या कोरोना संक्रमित झाल्याने त्याही नानावटीमध्ये दाखल होत्या. सगळ्यात आधी ऐश्वर्या आणि आराध्याच २७ जुलै रोजी डिस्चार्ज मिळाल्याने घरी पोहोचल्या होत्या.   

abhishek bachchan tested corona negative actor thanked for prayers  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com