अभिषेक मल्हान ठरला Bigg Boss OTT 2 चा पहिला फायनलिस्ट, चाहत्यांनी केलं सेलिब्रेशन

अभिषेक मल्हान Bigg Boss OTT 2 चा पहिला फायनलिस्ट ठरला आणि त्याच्या फॅन्सना आनंद झाला
 Abhishek Malhan bigg boss ott 2 became the first finalist of Bigg Boss OTT 2, fans celebrate
Abhishek Malhan bigg boss ott 2 became the first finalist of Bigg Boss OTT 2, fans celebrate SAKAL

Bigg Boss OTT 2 Finalist News: सलमान खान होस्ट असलेला Bigg Boss OTT 2 सध्या उत्कंठावर्धत वळणावर आहे. शो मध्ये आजवर अनेक रंजक गोष्टी पहायला मिळत आहेत. कधी भांडणं, कधी वादविवाद तर कधी प्रेम अशा अनेक गोष्टींमुळे Bigg Boss OTT 2 सध्या चांगलंच गाजतंय.

अशातच Bigg Boss OTT 2 चा पहिला फायनलिस्ट समोर आलाय. या फायनलिस्टचं नाव ऐकुन तुम्हाला नक्कीच आनंद होईल. जाणुन घ्या कोण आहे तो.

(bigg boss ott 2 first finalist)

 Abhishek Malhan bigg boss ott 2 became the first finalist of Bigg Boss OTT 2, fans celebrate
OMG 2 Trailer: भक्ताचा अंधकार दूर करायला अवतरले शंकर.. ओह माय गॉड 2 चा जबरदस्त ट्रेलर

हा ठरला Bigg Boss OTT 2 चा पहिला फायनलिस्ट

अखेर Bigg Boss OTT 2 ला पहिला फायनलिस्ट मिळाला आहे. अभिषेक मल्हान जो फुकरा इंन्सान या नावाने प्रसिद्ध आहे, तो या Bigg Boss OTT 2 चा शेवटचा कॅप्टन तर ठरलाच, पण तो पहिला फायनलिस्ट खेळाडूही ठरला आहे. हा आठवडा फॅमिली वीक होता, ज्यामध्ये स्पर्धकांचे सर्व हाऊसमेट त्यांना भेटण्यासाठी शोमध्ये आले होते.

घरातील सदस्यांना त्यांच्या आवडीच्या स्पर्धकाला स्टार द्यायचा होता. ज्या दोन स्पर्धकांना जास्तीत जास्त स्टार्स असतील त्यांच्यामध्ये एक टास्क होणार होता. विजेता स्पर्धक केवळ घराचा कॅप्टन बनत नाही तर 'बिग बॉस ओटीटी 2' ची पहिला फायनलिस्ट देखील होणार होता. आता 'बिग बॉस ओटीटी 2' ला अभिषेक मल्हानच्या रूपाने त्याचा फायनलिस्ट आणि कर्णधार मिळाला आहे.

पुजा भट आणि अभिषेक मध्ये रंगली चुरस

बिग बॉस OTT 2 चे अपडेट देणाऱ्या 'द खबरी'नुसार, 'तिकीट टू फिनाले' टास्क पुन्हा सुरू झाल्यानंतर जैद हदीद पूजा भट्टच्या प्रतिनिधी बनला. दुसऱ्या बाजूला अभिषेक मल्हान होता.

पूजा आणि अभिषेक यांच्यात कर्णधार आणि अंतिम फेरीसाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली.

 Abhishek Malhan bigg boss ott 2 became the first finalist of Bigg Boss OTT 2, fans celebrate
Nitin Desai: 'त्यांच्या हातात स्टुडिओ देऊ नका',अखेरच्या ऑडीओ क्लिपमध्ये नितीन देसाईंची PM मोदींना भावनिक साद

अभिषेक जिंकला फॅन्स खुश झाले

अभिषेक आणि पुजाला सपोर्ट करण्यासाठी स्पर्धकांनी पूर्ण उत्साहात हे कार्य सुरू केले. प्रत्येकजण आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकण्यासाठी पाठिंबा देऊ लागला.

टास्क पूर्ण झाल्यानंतर, बिग बॉसने ऑपरेटरला विजेत्याचे नाव घोषित करण्यास सांगितले. आणि शेवटी अभिषेक मल्हान Bigg Boss OTT 2 चा पहिला फायनलिस्ट ठरला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com