आमची पहिली भेट झाली तेव्हा ती स्टार होती अनं मी प्रॉडक्शन बॉय...

अभिषेकने शेअर केला ऐश्वर्यासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा....
Abhishek Bachchan,Aishwarya Rai-bachchan
Abhishek Bachchan,Aishwarya Rai-bachchanGoogle

ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाला जवळपास चौदा वर्ष झाली आहेत. त्या दोघांचं लग्न म्हणजे एक नेत्रदीपक सोहळा होता. सोनेरी रंगाच्या पेहरावात आभुषणांनी न्हाऊन निघालेली ऐश्वर्या आणि तिला शोभेल असा राजबिंडा अभिषेक पाहणं म्हणजे फॅन्ससाठी एक सुवर्णसंधी होती. अर्थात कडक सुरक्षेच्या कारणास्तव दोघांच्या ओझरत्या दर्शनाने देखील धन्य पावलेल्या त्यांच्या फॅन्ससाठी हे ही नसे थोडके अशी म्हणण्याची वेळ होती ती. आता या दोघांची प्रेमकहाणी जितकी रंजक होती तितकीच त्यांची पहिली भेट. अभिषेकने ऐश्वर्याला न्यूयॉर्कमध्ये 'गुरू' सिनेमाच्या प्रिमियरनंतर एकदम फिल्मी स्टाईलने हि-्यांची खोटी अंगठी घालून प्रपोज केलं होतं. आणि ती अंगठी ऐश्वर्याने त्या सिनेमात वापरली होती. हा किस्सा या दोघांनीच एकदा मुलाखतीत शेअर केला होता. पण याहूनही थोडी हटके आहे या दोघांची पहिली भेट.

Abhishek Bachchan,Aishwarya Rai-bachchan
फराह खानचा करण जोहरसोबत 'K3G' च्या गाण्यावर धम्माल डान्स; पहा व्हिडीओ

त्याचं झालं असं की,अभिषेक सुरुवातीला अमिताभ बच्चन यांचा 'प्रॉडक्श बॉय' म्हणून काम पाहत होता. इथे दिसून येतंय की बॉलीवूडच्या शहेनशहानं आपल्या मुलाला कशापद्धतीनं मेहनत करून कमवायचे धडे दिले आहेत ते. तर आपल्या सगळ्यांना वाटत असेल की अभिषेक आणि ऐश्वर्या त्यांच्या 'ढाई अक्षर प्रेम के' या सिनेमाच्या निमित्ताने भेटले असतील. पण ते खरं नसून त्या आधी या दोघांची भेट झाली आहे ती ऐश्वर्या आणि बॉबी देओल अभिनित 'और प्या हो गया' या सिनेमाच्या सेटवर. त्यावेळी अभिषेक स्वित्झर्लंडमध्ये अमिताभ बच्चन यांच्या 'मृत्यूदाता' सिनेमासाठी त्यांचा 'प्रॉडक्शन बॉय' म्हणून गेला होता. तिथेच जवळ 'और प्यार हो गया' सिनेमाचं शुटिंग सुरू होतं. आता बॉबी आणि अभिषेकची आधीपासनं मैत्री असल्यामुळे अभिषेक तिथे त्याला भेटायला गेला. तेव्हा बॉबीने त्याला ''डिनर करून जा'' म्हणून आग्रह धरला. आणि मग तीच डिनर डेट ठरली अभिषेक-ऐश्वर्याची पहिली भेट. आता तिथे नेमकं असं काय घडलं की ऐश्वर्या अभिषेकला म्हणाली, ''तू काय बोललास ते कळले नाही''.

Abhishek Bachchan,Aishwarya Rai-bachchan
''आई तु या जगातील सर्वात पुढारलेली महिला आहेस,दुलारी रॉक''- अनुपम खेर

तर त्याचं झालं असं की, सुरुवातीला अभिषेकचं हिंदी इंग्रजाळलेलं होतं. आणि त्याचे इंग्लिश उच्चारही बरेच कठीण आणि न समजण्यासारखे होते असं एकदा तोच म्हणाला होता. कारण त्याचं संपूर्ण शिक्षण हे युरोपमध्ये इंटरनॅशनल बोर्डिंग स्कूलमध्ये झालं होतं. त्यामुळे त्याच्या जीभेला तिथल्या इंग्रजी भाषेचं वळण लागलेलं. सुरुवातीला त्याचं इंग्रजी समजायचा त्रास सगळ्यांना व्हायचा ते ह्याच कारणामुळे. त्या डिनर डेटला नेमंक झालं असं की अभिषेक काहीतरी त्याच्या हाय-फाय इंग्रजी भाषेत बोलला जे ऐश्वर्याला कळलं नाही आणि तिनं त्याला विचारलं की,''तू काय बोललास ते परत बोल एकदा''. आणि त्यावेळेस अभिषेक आपल्या बोलण्यामुळे खजील झाला होता. तर अशी होती ऐश्वर्या-अभिषेकची पहिली डेट.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com