दिग्दर्शक हिरानींवर लैंगिक शोषणाचे आरोप 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 जानेवारी 2019

मुंबई - प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. हिरानी यांच्यासोबत काही चित्रपटांमध्ये सहदिग्दर्शिका म्हणून काम करणाऱ्या महिलेने हे आरोप केले आहेत. मार्च ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत हिरानी यांनी आपल्याशी गैरवर्तणूक केली असा आरोप या महिलेने केला आहे. ‘संजू’ चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान हिरानी यांनी माझे लैंगिक शोषण केले. आपण या शोषणाला विरोध केल्यानंतर आपल्याकडून चित्रपट काढून घेतला जाईल अशी धमकीही हिरानी यांनी दिल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. 

या महिलेने हे आरोप एका मेलद्वारे केले आहेत. तसेच चित्रपट समीक्षिका अनुपमा चोप्रा, पटकथा लेखक अभिजित जोशी आणि विधू विनोद यांची बहीण शेली चोप्रा यांनाही हा आरोपांचा मेल पाठवला आहे. राजकुमार हिरानी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. एका रात्री माझ्याशी करण्यात आलेल्या गैरवर्तणुकीमुळे मी पूर्णपणे खचून गेले, असे या महिलेने म्हटले आहे. तर दुसरीकडे आपल्यावर करण्यात आलेले आरोप अतिशय खोटे असल्याचे राजकुमार हिरानी यांनी म्हटले आहे. ‘पीके’, ‘संजू’, ‘थ्री इडियट्‌स’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन राजकुमार हिराणी यांनी केले आहे. या महिलेने केलेल्या आरोपासंदर्भात मी चौकशीसाठी पूर्णपणे तयार असल्याचेही हिरानी यांनी म्हटले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The accusations of sexual exploitation of famous director Hirani