मराठी गाण्याला शामकची कोरिओग्राफी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मार्च 2017

बॉलीवूड इंडस्ट्रीतला कोरिओग्राफर शामक दावर आपल्या अनोख्या डान्स फॉर्ममुळे चांगलाच प्रसिद्ध आहे. कंटेम्पररी डान्सचा गुरू म्हणून त्याची ख्याती आहे. जाझ अन्‌ वेस्टर्न डान्स बॉलीवूडमध्ये प्रेझेंट करण्याचे श्रेय त्याला जाते. एवढा मोठा कोरिओग्राफर प्रथमच मराठी चित्रपटासाठी एका गाण्याचे नृत्य दिग्दर्शन करीत आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर विक्रम फडणीस "हृदयांतर' चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकत आहे. विक्रम अन्‌ शामक बेस्ट फ्रेंड मानले जातात. म्हणूनच शामक "हृदयांतर'चे एक गाणे कोरिओग्राफ करणार आहे. 

यंग बेरी एंटरटेन्मेंटची निर्मिती असलेला "हृदयांतर' एक भावनिक चित्रपट असून त्यात सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे प्रमुख भूमिकेत आहे. 
शामक म्हणाला, की जेव्हा मला विक्रमने चित्रपटासाठी विचारले तेव्हा मी त्याला लगेचच हो म्हटले. माझ्या तीस वर्षांच्या करियरमध्ये मी एकाही मराठी चित्रपटासाठी नृत्य दिग्दर्शन केले नव्हते. मी नेहमीच बॉलीवूडशी जोडला गेलेला आहे. विक्रम माझा खूप चांगला मित्र आहे. फक्त त्याच्यासाठी मी हे आव्हान स्वीकारले. मलाही काहीतरी वेगळे करायचे होते. विक्रमने मला हवे तसे काम करण्याची मुभा दिल्याने माझे काम सोपे झाले. 
"शामक दावर माझ्या चित्रपटातील एका गाण्याचे नृत्य दिग्दर्शन करतोय, त्याबद्दल मला अतिशय अभिमान आहे. मी त्यांना 25 वर्षांपासून ओळखतो. इतक्‍या वर्षांच्या आमच्या नात्यामुळेच शामक माझ्या पहिल्या चित्रपटासाठी नृत्य दिग्दर्शन करण्यास तयार झालेत याचा आनंद आहे. आम्ही नुकतेच त्यांनी नृत्य दिग्दर्शन केलेले गाणे चित्रीत केले,' असे विक्रम म्हणाला. नुकतेच चित्रपटाच्या चित्रीकरणाचे दुसरे शेड्युल पूर्ण झाले. 
शामकने बॉलीवूडमध्ये आतापर्यंत अनेक चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन केलेय. "दिल तो पागल है', "धूम 2', "किस्ना', "ताल', " तारे जमीन पर', "युवराज', "रब ने बना दी जोडी' आदी अनेक चित्रपटांची गीते त्याने कोरिओग्राफ केली आहेत. 

Web Title: Ace Dancer Choreographer Shiamak Davar expresses his joy to choreograph his first ever dance for an upcoming Marathi film Hrudayantar by Vikram Phadnis.