‘फोर्स २’ चित्रपटात ॲक्‍शन धमाका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

ॲक्‍शन चित्रपटांची परिभाषा बदलली आहे. सुरुवातीला आणि चित्रपटाच्या शेवटी फक्‍त ॲक्‍शन ड्रामा हा जमाना आता गेला आहे. ही परिभाषा ‘फोर्स’ या जॉन अब्राहमच्या चित्रपटाने बदलेली होती. आता ‘फोर्स २’ या चित्रपटाने ही परिभाषा अजूनच अधोरेखित केली आहे. हा चित्रपट संपूर्ण ॲक्‍शन सीनने परिपूर्ण आहे. जॉन आणि नवीन ॲक्‍शन अभिनेत्री सोनाक्षी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. परदेशी स्टाईलचे ॲक्‍शन सीन या चित्रपटात या दोघांनी केले आहेत. या चित्रपटात आठ असे ॲक्‍शन सीन आहेत, जे प्रेक्षकांना खिळवून ठेवतील. जॉनने ‘फोर्स’ या चित्रपटाच्या पहिल्या भागात आपल्या ॲक्‍शन सीनने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेच होते.

ॲक्‍शन चित्रपटांची परिभाषा बदलली आहे. सुरुवातीला आणि चित्रपटाच्या शेवटी फक्‍त ॲक्‍शन ड्रामा हा जमाना आता गेला आहे. ही परिभाषा ‘फोर्स’ या जॉन अब्राहमच्या चित्रपटाने बदलेली होती. आता ‘फोर्स २’ या चित्रपटाने ही परिभाषा अजूनच अधोरेखित केली आहे. हा चित्रपट संपूर्ण ॲक्‍शन सीनने परिपूर्ण आहे. जॉन आणि नवीन ॲक्‍शन अभिनेत्री सोनाक्षी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. परदेशी स्टाईलचे ॲक्‍शन सीन या चित्रपटात या दोघांनी केले आहेत. या चित्रपटात आठ असे ॲक्‍शन सीन आहेत, जे प्रेक्षकांना खिळवून ठेवतील. जॉनने ‘फोर्स’ या चित्रपटाच्या पहिल्या भागात आपल्या ॲक्‍शन सीनने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेच होते. तो ‘फोर्स २’मध्येही प्रेक्षकांना आपल्या ॲक्‍शनने भारावून टाकण्यासाठी तयार आहे. या चित्रपटात त्याने मर्सिडीज गाडी उचलली आहे. असे एकाहून एक भारी सीन या चित्रपटात पाहायला मिळतील. ‘फोर्स २’ हा चित्रपट १८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: action dhamaka in force2 movie

टॅग्स