विद्युत जामवालने घेतली 'या' दिग्गज अॅक्शन स्टारची व्हर्चुअल भेट...

संतोष भिंगार्डे
Tuesday, 14 July 2020

अभिनेता विद्युत जामवाल म्हणतो की मार्शल आर्टची विद्या प्राप्त करण्यासाठी आपले संपूर्ण जीवन मार्शल आर्टसाठी समर्पित करावे लागते. मार्शल आर्ट उपक्रमांबद्दल आणि त्यावर आपले लक्ष केंद्रित करण्यास प्रेरित करणारे तत्वज्ञान या बाबतीत आमच्या कल्पनांमध्ये बरेच साम्य आहे.

मुंबई : अभिनेता विद्युत जामवालने वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतलेले आहे. हिंदी चित्रपटांबरोबरच तमीळ आणि तेलगू इंडस्ट्रीतही त्याने काम केले आहे. त्याचे चित्रपटातील अॅक्शन सीन्स डोळ्यांची पारणे फेडणारी असतात. सध्या लॉकडाऊनमध्ये थायलंडचे दिग्गज अॅक्शन स्टार टोनी जा यांच्याबरोबर तो व्हिडीओ चॅटव्दारे कलारिपयट्टूचे प्रशिक्षण घेत आहे. या व्हिडीओ कॉल्समध्ये विद्युत आणि टोनी यांनी एकमेकांशी फिटनेससंबंधी खूप गप्पा मारीत असतात. 

नवी मुंबई महापालिका आयुक्तांची पुन्हा बदली, नव्या आयुक्तांनी स्विकारला पदभार

विद्युतच्या टीमने या दोन जणांच्या व्हर्चुअल गप्पांना व्हिडिओमध्ये रूपांतरित केले आहे. ते लवकरच ही क्लिप विद्युतच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर करणार आहेत. 

चिंताजनक! राज्यातील युवाशक्तीच कोरोनाच्या सावटात; तब्बल 'इतक्या' हजारांहून अधिक तरुणाईला बाधा...

अभिनेता विद्युत जामवाल म्हणतो की मार्शल आर्टची विद्या प्राप्त करण्यासाठी आपले संपूर्ण जीवन मार्शल आर्टसाठी समर्पित करावे लागते. मार्शल आर्ट उपक्रमांबद्दल आणि त्यावर आपले लक्ष केंद्रित करण्यास प्रेरित करणारे तत्वज्ञान या बाबतीत आमच्या कल्पनांमध्ये बरेच साम्य आहे. ज्यांनी आपल्या आयुष्यात बरेच काही साध्य केले आहे त्यांच्याशी बोलणे हा माझ्यासाठी एक चांगला अनुभव होता.

---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: action star vidyut jamwal virtuals meets with tony ja