चिंताजनक! राज्यातील युवाशक्तीच कोरोनाच्या सावटात; तब्बल 'इतक्या' हजारांहून अधिक तरुणाईला बाधा...

भाग्यश्री भुवड
सोमवार, 13 जुलै 2020

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, लॉकडाऊनच्या काळात कामानिमित्त तरुणाईच सर्वाधिक बाहेर पडत आहेत. आणि त्याच कारणांमुळे ते सर्वात जास्त कोरोनाच्या विळख्यात येत आहेत.

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सद्यस्थितीत गंभीर होत चालली आहे. दिवसागणिक राज्यातील स्थिती गंभीर होत असताना केवळ ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे म्हटले जात होते. मात्र, राज्यातील 90 हजारांहून अधिक तरुण कोरोना बाधित आहेत. त्यामुळे येत्या काळात केवळ ज्येष्ठ नागरिकांनीच नव्हे तर तरुण वर्गानेही आरोग्याची अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे.

मराठी चित्रपटसृष्टी येतेय हळूहळू पूर्वपदावर; टिझर लॉंचिंगसह चित्रीकरणाला सुरुवात...​

राज्यात सध्या 21 ते 30 वयोगटातील 42 हजार 457 रुग्ण आहेत, तर 31 ते 40 वयोगटातील 47 हजार 8,585 रुग्ण आहेत. एकूण रुग्णसंख्येत 21 ते 30 वयोगटातील रुग्णांचे प्रमाण 17.89 तर 31 ते 40 वयोगटातील रुग्णांचे प्रमाण तब्बल 20.17 टक्के आहे.

सीबीएसईच्या बारावीच्या निकालात मुलींची बाजी; तब्बल दोन लाख विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण... 

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, लॉकडाऊनच्या काळात कामानिमित्त तरुणाईच सर्वाधिक बाहेर पडत आहेत. आणि त्याच कारणांमुळे ते सर्वात जास्त कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. कोरोनाच्या विळख्यात तरुणाई अडकण्याची प्रमुख दोन कारणे असून कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे ते संसर्गात येत आहेत. 

मुंबईने करून दाखवलं; दररोज केवळ 'इतक्याच' बेडची आवश्यकता...

तर, दुसरे मुख्य कारण म्हणजे अनेक तरुण लॉकडाऊनचे पालन करत नाहीत. कुटुंबातील इतर कोणी बाहेर पडू नये म्हणुन तरूणच घराबाहेर पडत आहेत, यामुळे तरुणाईला होणाऱ्या संसर्गात वाढ होताना दिसतेय. तरुणाईला जीवनशैलीशी निगडीत आजारांचा विळखा असतो. मात्र बऱ्याचदा या आजारांचे निदान होत नाही किंवा उशिराने निदान होते तोपर्यंत आरोग्याचा धोका वाढलेला असतो, अशी माहिती संक्रमण रोगांचे विशेषज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांनी दिली
--
संपादन : ऋषिराज तायडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young population in maharahstra faces corona virus infection