किती वेळा हर्षद मेहता राव!; आता ज्युनिअर बच्चनच्या 'बिग बुल' चा टीझर आऊट

actor Abhishek bachchan the big bull release date April 8 Disney hotstar
actor Abhishek bachchan the big bull release date April 8 Disney hotstar

मुंबई - तुम्हाला स्कॅम 1992 आठवतोय का, जी मालिका हर्षद मेहता नावाच्या एका शेअर मार्केटमध्ये बिझनेस करणा-या व्यक्तीवर आधारित होती. देशातील सर्वाधिक लोकप्रिय झालेली मालिका म्हणून त्या मालिकेचे नाव घेतले जाते. आता पुन्हा त्याच विषयावर एक नवा चित्रपट येतो आहे. तो ही हर्षद मेहता नावाच्या व्यक्तीवर आधारित आहे. त्यात ज्युनिअर बच्चन काम करणार आहे, त्याचा टीझर व्हायरल झाला आहे. तो कमालीचा लोकप्रिय झाला आहे. त्याचा वेगळा लुक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. बिग बुलची गेल्या अनेक दिवसांपासून वेध लागले होते. त्याच्या ट्रेलरची डेट प्रसिध्द करण्यात आली आहे.

बिग बुल हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्याच्या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. त्याचे पोस्टर यापूर्वी प्रसिध्द झाले होते. त्यात अभिषेकच्या लुकची चर्चा झाली होती. तो पोस्टर पाहिल्यानंतर अभिषेकच्या गुरु चित्रपटाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यातील लुक आणि बिग बुलमधील लुक जवळपास सारखा दिसतो आहे. द बिग बुल फिल्म डिज्नी  प्लस हॉटस्टार वीआईपीवर प्रदर्शित होणार आहे. खरं तर ही मागच्या वर्षीच हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनाचा त्याला फटका बसला.

आता जो टीझर समोर आला आहे त्यात अभिनेता अजय देवगणच्या आवाज ऐकायला येतो. तो म्हणतो की, छोट्या घरात स्वप्नं पाहणा-यांना मोठी स्वप्नं पाहायची मनाई केलेली असते. त्यामुळे त्यातील बहुतांशी लोकं ही आपलं वेगळं विश्व तयार करतात. द बिग बुल  - द मदर ऑफ ऑल स्कॅम्स. असे म्हटले गेले आहे. त्याचा ट्रेलर 19 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. द बिग बुलची स्टोरी ही 1992 च्या वेळची आहे. त्यात हर्षद मेहता नावाच्या व्यक्तीनं देशाला हादरवून सोडलं होतं. त्यावेळी दलाल स्ट्रीटमध्ये हर्षद मेहता हे नाव बिग बुल म्हणून घेतले जात होते. 

एका सत्य घटनेवर हा चित्रपट आधारित आहे. सामान्य कुटूंबातील किती मोठा होऊ शकतो याचे उदाहरण त्यातून पाहायला मिळाले. अभिषेक बच्चन याची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट पहिल्यांदा 23 ऑक्टोबर 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com