सिंघम साकारणार 'डॉन' ची भूमिका; 10 दिवसांत पॅक अप

actor ajay devgn to play don Karim lala in sanjay leela bhansal gangubai kathiawadi movie
actor ajay devgn to play don Karim lala in sanjay leela bhansal gangubai kathiawadi movie

मुंबई - वन्स अपॉन टाईम इन मुंबई या चित्रपटात सुलताना मिर्झाची भूमिका ज्या प्रकारे अजय देवगणनं साकारली त्याला तोड नव्हती. त्याच्या त्या भूमिकेचे प्रेक्षकांनी जोरदार स्वागत केले होते. सुलतान मिर्झा प्रचंड लोकप्रिय झाला होता. अजयच्या सर्वोत्तम भूमिकेपैकी एक अशी भूमिका म्हणून त्याचे नाव घेता येईल. निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या  'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटातील अभिनेता अजय देगवणच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अजय अंडरवर्ल्ड डॉन करीम लालाची भूमिका करणार आहे.

हुसेन जैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित या चित्रपटात डॉन गंगूबाईची कहाणी दाखवण्यात येणार आहे. गंगुबाई हे 60 च्या दशकात मुंबई माफियाचे एक मोठे नाव होते. गंगुबाई यांना त्यांच्या पतीने केवळ 500 रुपयांत विकले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार,  अजय देवगण आपल्या या भूमिकेचे चित्रिकरण हे  10 दिवसांत अजय त्याच्या भूमिकेचे चित्रीकरण पूर्ण करणार आहे.  आता अजय त्याच्या आगामी 'मे डे' या चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे. या चित्रपटात तो दिग्दर्शनही करणार आहे.

मे डे'चे काम पूर्ण झाल्यानंतर अजय गंगुबाई काठियावाडीच्या चित्रिकरणाला सुरुवात करणार आहे. 'मे डे' या चित्रपटात अजयसह अमिताभ बच्चन आणि रकुल प्रीत सिंग महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.या चित्रपटाच्या सेटवरुन अजय आणि अमिताभ यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुंबईत या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. चित्रपटात अजय एका वैमानिकाच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात आलिया आणि अजय देवगण यांच्यासह शांतनु माहेश्वरी, सीमा पाहवा आणि विजय राज मुख्य भूमिकेत असतील. या चित्रपटात फाळणीच्या आधी आणि नंतरची कथा देखील दाखवण्यात आली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com