
पडत्या काळात ज्यांनी साथ दिली त्यासगळ्यांना चांगल्या वेळी सहकार्य करण्याचे काम अक्षयनं केलं आहे. ही त्याची वेगळी ओळख आहे.
मुंबई - बॉलीवूडचा प्रसिध्द कलाकार अक्षय कुमार हा जसा त्याच्या अभिनयासाठी प्रसिध्द आहे तसा तो त्याच्या राजकीय भूमिकेसाठीही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये बॉलीवूड तयार करण्याच्या महत्वकांक्षी प्रोजेक्टमध्ये त्याचा मोठा सहभाग होता. असेही म्हटले जाते. आता अक्षय कुमार त्याच्या एका पोस्टमुळे सर्वांच्या कुतूहलाचा विषय आहे.
आपल्याला पडत्या काळात ज्यांनी साथ दिली त्यासगळ्यांना आपल्या चांगल्या वेळी सहकार्य करण्याचे काम अक्षयनं केलं आहे. ही त्याची वेगळी ओळख आहे. अक्षय आणि साजिद नाडियावाला यांचे संबंध सर्वांना माहिती आहेत. त्यांच्या बॅनरखाली अक्षयनं अनेक चित्रपट केले आहेत. अक्षयनं नुकतीच दिग्दर्शक साजिद नाडियावाला याला जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यानं सांगितले आहे की, असा एक व्यक्ती आहे तो माझी सर्व बीलं आतापर्यत भरत आला आहे. त्याची ही पोस्ट वाचल्यानंतर त्याच्या चाहत्यांना कळून चुकले की तो साजिद नाडियावालाविषय़ी बोलत आहे ते.
Happy birthday to the man who literally pays my bills, the best producer one could ask for and an even better friend, #SajidNadiadwala Wishing you abundance of health, wealth and happiness. pic.twitter.com/Me5O77BRpU
— Akshay Kumar (@akshaykumar) February 18, 2021
अक्षयनं साजिदच्या हाऊसफुल, हाऊसफुल २. 3 आणि 4 थ्या आता अक्षय कुमारनं जो फोटो शेअर केला आहे त्यात तो हाऊसफुल 4 च्या सेटचा आहे. त्यात अक्षय टकल केलेला दिसून आला आहे. अक्षयनं लिहिलं आहे की, हॅप्पी बर्थ डे साजिद. तु माझा चांगला मित्र आहे. आतापर्यत माझी सगळी बिलं तु भरली आहेस. याचा मला आनंद असल्याची टिप्पणी अक्षय़नं यावेळी केली आहे.
‘काळी माती’ चित्रपटानं पटकावले तब्बल 52 पुरस्कार
नवरदेवासमोर नाचणारा मोर पाहिलात का?; व्हिडिओ झाला व्हायरल
देव तुला चांगलं आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो ही त्याच्याक़डे प्रार्थना. असेही त्यानं म्हटले आहे. यंदाच्या वर्षी अक्षय़ची मोस्ट वेटिंग मुव्ही सूर्यवंशी प्रदर्शित होणार आहे. गेल्या वर्षभरापासून हा चित्रपट प्रदर्शनासाठी रेंगाळल्याचे दिसून आले आहे.