...नाहीतर आम्हाला तुरुंगात जावे लागले असते; अभिनेता अमित साधने सांगितला भन्नाट किस्सा...

संतोष भिंगार्डे
Monday, 27 July 2020

हा चित्रपट मैत्रीवर असल्याने अमित सादने आपल्या एका मित्राचा न्यूयॉर्कमधील किस्सा शेअर केला. तो किस्सा प्रत्यक्ष घडलेला होता आणि अमित साद व त्याचा तो मित्र यांना तुरुंगाची हवा खायला लावणारा होता.

मुंबई : 'झी 5' वर  "यारा" हा चित्रपट आता प्रदर्शित होणार आहे. ही चार मित्रांची कहाणी आहे. हे चारही मित्र जीवाभावाचे आहे. त्यांच्यामध्ये कमालीची एकी आहे. एकमेकांची सुख आणि दुःखे ते नेहमी शेअर करीत असतात. यातील एका मित्राची भूमिका अमित सादने केली आहे. हा चित्रपट मैत्रीवर असल्याने अमित सादने आपल्या एका मित्राचा न्यूयॉर्कमधील किस्सा शेअर केला. तो किस्सा प्रत्यक्ष घडलेला होता आणि अमित साद व त्याचा तो मित्र यांना तुरुंगाची हवा खायला लावणारा होता.

'तो' व्हिडिओ डोंबिवलीतील नव्हेच; व्हायरल व्हिडिओचं सत्य अखेर उघड... 

अमित साद म्हणाला, की मी न्यूयॉर्कमध्ये शिकायला होतो तेव्हाची ही घटना. आम्ही सगळे मित्र बाहेर फिरायला गेलो होतो. आमच्यातील एक मित्र काहीसा अतरंगी आणि धाडसी होता. फिरता फिरता एका बाजूला उभ्या असलेल्या पोलिसांच्या गाडीपाशी तो गेलो. गाडीत कुणीही नसल्यामुळे त्याने गाडीत शिरण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न सफल झाला नाही म्हणून तो त्या गाडीची छायाचित्रे काढू लागला. 

हा दोष कुणाचा? व्हेंटिलेटरसाठी सहा तास, तर अंत्यसंस्कारासाठी 16 तासांची प्रतिक्षा....​

तेवढ्यात मला त्या गाडीचा चालक अर्थात पोलिस समोरून येताना दिसला. त्याला पाहताच माझी भंबेरी उडाली आणि मी ताबडतोब मित्राला इशारा केला. तोपर्यंत तो पोलिस गाडीजवळ पोहोचला आणि त्याने दटावणीच्या स्वरात मित्राला विचारले. नंतर त्याला गाडीत बसण्यास सांगितले. माझी तरआता बोबडीच वळायची बाकी होती कारण तो पोलिस आता आम्हाला जेलमध्ये टाकणार हे जवळजवळ नक्की झाले होते. 

मुख्यमंत्र्यांच्या स्टिअरींच्या विधानांनंतर उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अजित पवारांकडून सूचक फोटो ट्विट

मग मीच पुढे होऊन त्या पोलिसाला गयावया करू लागलो. आम्ही स्टुडंट आहोत, आम्ही फक्त गाडी पाहात होतो ती केवळ एक उत्सुकता म्हणून, माफ करा...हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो. माझ्या मित्रातर्फे मी माफी मागतो...माझे नशीब बलवत्तर होते कारण तो पोलिसवाला चांगला होता. त्याने आम्हाला माफ केले. नाही तर त्या दिवशी मित्राच्या नको त्या धाडसामुळे आम्हाला तुरुंगाची हवा खावी लागली असती.
----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor amit sadh shares incidents happens in new york while he was students