अमिताभ बच्चन यांनी दिल्या एकादशीच्या शुभेच्छा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

आजच्या दिवसानिमित्त कित्येक जणांनी सोशल मिडीयावरुन आषाढी एकादशीच्या शुभेच्छा शेअर केल्या आहेत. यांपैकीच एक नाव म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन. 

मुंबई : आज आषाढी एकादशी निमित्त संपुर्ण महाराष्ट्रात आनंदाचं वातावरण आहे. 'हे विठ्ठला, सर्वांना सुखी ठेव' अशीच अर्चना करताना जो तो भक्त दिसत आहे. आजच्या दिवसानिमित्त कित्येक जणांनी सोशल मिडीयावरुन आषाढी एकादशीच्या शुभेच्छा शेअर केल्या आहेत. यांपैकीच एक नाव म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन. 

अमिताभ बच्चन यांनी मराठीतून हरीनामाचा उल्लेख करत ट्विट केले आहे आणि आषाढी एकादशीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. 
 

अमिताभ बच्चन यांनी 'पांडुंरंगा माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे..' अशी प्रार्थना करीत विठ्ठलाच्या पालखीसोबत वारकऱ्यांचा टाळ मृदुंगाने गजर करतानाचा फोटो अपलोड केला आहे. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Amitabh Bachchan tweeted about Aashadhi Ekadashi