esakal | 'क्राईम पेट्रोल' फेम अनुप सोनी खऱ्या आयुष्यातही बनला क्राईम सीन इन्व्हेस्टिगेटर
sakal

बोलून बातमी शोधा

Anup Soni

'क्राईम पेट्रोल' फेम अनुप सोनी खऱ्या आयुष्यातही बनला क्राईम सीन इन्व्हेस्टिगेटर

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

अभिनेता अनुप सोनी Anup Soni हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कलाकार आहे. 'क्राईम पेट्रोल' Crime Patrol या मालिकेमुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. अनुपने या मालिकेचे सूत्रसंचालन केले होते. त्याने नुकतेच क्राइम सीन इन्व्हेस्टिगेशन प्रमाणपत्र मिळवले आहे. या प्रमाणपत्राचा फोटो शेअर करून चाहत्यांना त्याने याबद्दलची माहिती दिली. सध्या त्यांच्या पोस्टची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. प्रमाणपत्रासाठी अनुपने गुन्हे तपासाचं शिक्षण घेतलं आहे. प्रमाणपत्राचा फोटो शेअर कर त्याने कोर्स करताना त्याच्या काय भावना होत्या, याबद्दल सांगितलं आहे. (actor Anup Soni Is Now A Certified Crime Scene Investigator)

अनुपने कॅप्शनमध्ये लिहिले, 'मी गुन्हे तपासाचा कोर्स पूर्ण केला आहे. लॉकडाऊनमध्ये मी ठरवले होते की मी माझा वेळ काही तरी वेगळं करण्यात घालवेन. हा कोर्स करणे खूप आव्हानात्मक होते. मला पुन्हा माझ्या शैक्षणिक काळात परत गेल्यासारखे वाटले. मी हा कोर्स करण्याचा निर्णय घेतला याचा मला अभिमान आहे.' अनुपच्या या पोस्टला कमेंट करून अनेक कलाकारांनी आणि त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा: वेळ विचारण्याच्या बहाण्याने सविता मालपेकरांची सोनसाखळी खेचून चोर पसार

अभिनेत्री प्रगती मेहराने अनुपच्या पोस्टला कमेंट केली, 'वा! तुम्ही क्राईम पेट्रोलमधील तुमची भूमिका खुप गांभिर्याने घेतलेली दिसत आहे.' एका नेटकऱ्याने कमेंट केली, 'खूप छान, आता खऱ्या गुन्हे तपासणी अधिकाऱ्यास या शोचे सूत्रसंचालन करताना पाहणे हे औत्सुकतेचे असेल', एका युजरने लिहिले, 'या कोर्समुळे तुमचा अभिनय अजून रिअलिस्टिक होईल.'

अनुपच्या बालिका वधू मधील भैरव सिंह या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्याचप्रमाणे 'तांडव' या वेब सीरिजमध्ये देखील त्याने काम केले आहे.

हेही वाचा: 'कसौटी जिंदगी की' फेम साहिलचा सोशल मीडियाला रामराम

loading image