esakal | 'कसौटी जिंदगी की' फेम साहिलचा सोशल मीडियाला रामराम
sakal

बोलून बातमी शोधा

'कसौटी जिंदगी की' फेम साहिलचा सोशल मीडियाला रामराम

'कसौटी जिंदगी की' फेम साहिलचा सोशल मीडियाला रामराम

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कसौटी जिंदगी के फेम साहिल आनंद हा गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होता. त्याला त्याच्या चाहत्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसादही मिळाला. मात्र आता त्यानं सोशल मीडियापासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हजारो फॅनफॉलोअर्स असणाऱ्या साहिलच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करुन ही माहिती दिली आहे. त्या पोस्टमध्ये आपण एका मानसिक व्याधीशी सामना करत असल्याचे त्यानं सांगितले आहे. (kasautii zindagii kay s sahil anand quits social media says tried my best yst88)

साहिलनं लिहिलं आहे की, गेल्या काही दिवसांपासून आपण एक वेगळ्या परिस्थितीतून जात आहोत. याची कल्पना माझ्या फॅन्सला नाही. त्यामुळे मला सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहता येईल किंवा नाही, याबाबत खात्रीनं सांगता येत नाही. म्हणून सध्याच्या घडीला मी त्यापासून लांब जाण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय त्यानं अनेक गोष्टी पोस्टमध्ये नमुद केल्या आहेत. त्यानं लिहिलं आहे की, तुम्हा सगळ्यांना नमस्कार, मला आशा आहे की, तुम्ही सर्वजण ठीक असाल, तुम्ही सर्वजण काळजी घ्या. हे जास्त महत्वाचे आहे.

गेल्या काही दिवसांपासून मी माझ्यापासून हरवत चाललो आहे. असे मला वाटत आहे. काही महिने मला खूपच त्रासदायक गेले आहे. अनेक अडचणी समोर आल्या आहेत. त्याला सामोरं जाताना माझी दमछाक झाली आहे. याविषयी आणखी कुणाला सांगावे असा प्रश्न मला पडला आहे. त्यामुळे मला परत माझ्या विश्वात यायचं असल्यास काही काळ स्पेस हवी आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. कधी कधी तुमच्यातील अति उत्साहच तुम्हाला निराशेच्या गर्तेत घेऊन जातो. असे मला वाटते. मित्रांनो आपले मानसिक स्वास्थ्य अधिक महत्वाचे आहे.

हेही वाचा: वेळ विचारण्याच्या बहाण्याने सविता मालपेकरांची सोनसाखळी खेचून चोर पसार

हेही वाचा: राजच्या अटकेनंतर सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीवर मीम्स

आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडू नये याची काळजी आपण घ्यायला हवी. काही दिवसांपूर्वी साहिलनं आपण वडिल झाल्याची बातमी सोशल मीडियावरुन सगळ्यांना दिली होती. त्यावेळी त्याच्या फॅन्सला मोठ्या प्रमाणावर आनंद झाला होता. त्यानं आपल्या मुलाविषयी लिहिले होते, नमस्कार माझे नाव सहराज आनंद, माझा जन्म 14 एप्रिल 2021 मध्ये झाला. माझ्यामुळे माझ्या आई वडिलांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

loading image