esakal | गरजूंसाठी अभिनेता बनला अ‍ॅम्ब्युलन्स ड्राइव्हर

बोलून बातमी शोधा

Kannad Actor Arjun Gowda
गरजूंसाठी अभिनेता बनला अ‍ॅम्ब्युलन्स ड्राइव्हर
sakal_logo
By
स्वाती वेमूल

कोरोनाच्या कठीण काळात सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण गरजूंची विविधप्रकारे मदत करत आहेत. काहीजण आर्थिकरित्या तर काहीजण वैद्यकिय सुविधा पुरवून मदतीचा हात पुढे करत आहेत. अशातच प्रसिद्ध कन्नड अभिनेता अर्जुन गौडा अॅम्ब्युलन्स ड्राइव्हर बनून लोकांची मदत करत आहे. 'प्रोजेक्ट स्माइल ट्रस्ट'अंतर्गत अर्जुन ही मदत करत आहे. रुग्णालयात जाण्यासाठी किंवा अंत्यसंस्कारासाठी ज्यांना गरज आहे, अशा लोकांची तो अॅम्ब्युलन्स ड्राइव्हर बनून मदत करत आहेत.

"गेल्या काही दिवसांपासून मी अॅम्ब्युलन्स चालवत आहे आणि आतापर्यंत सहा लोकांची अंत्यसंस्कारात मदत केली आहे. ते कुठूनही येवोत किंवा कोणत्याही धर्माचे असोत, गरजूंना वेळेवर मदत मिळाली पाहिजे हा माझा उद्देश आहे", असं तो म्हणाला. हे मदतकार्य पुढील एक- दोन महिने सुरू ठेवणार असल्याचं त्याने यावेळी सांगितलं.

हेही वाचा : रणधीर कपूर यांना ICU मध्ये हलवलं

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कठोर निर्बंध लागू असल्याने कोरोनाबाधितांचा आकडा काहीसा नियंत्रणात आला असला तरी आजही ६५ हजारच्या पुढे आहे. त्यामुळे सध्याचे निर्बंध आणखी पंधरा दिवस वाढविण्यात आले आहेत.