अग्गंबाई सासूबाईमधला सोहम म्हणतोय 'शेजारचे माझ्याकडे दुलर्क्ष करु लागलेत'

वृत्तसंस्था
बुधवार, 15 जानेवारी 2020

'अग्गंबाई सासूबाई' मालिकेतील सोहम म्हणजेच अभिनेता आशुतोष पत्की याने त्याच्या या मालिकेतील अनुभवाविषयी माहिती दिली आहे. तो म्हणाला, '' होय य़ा मालिकेतील माझी भूमिका काहीशी नकारात्मक आहे. सोहम हा निष्काळजी, आईची काळजी न करणारा बिघडलेला मुलगा आहे. ''

मुंबई : चित्रपटाची जेवढी लोकप्रियता आहे तेवढीच लोकप्रियता एखाद्या मालिकेचीही असते. झी मराठी वरील प्रसिद्ध मालिका 'अग्गंबाई सासूबाई' प्रेक्षकांच्या खास पसंतीत उतरली आहे. कोणत्याही तरूण जोडप्याला लाजवेल अशी लव्हस्टोरी सध्या 'अगं बाई सासूबाई'मध्ये सुरू आहे. अभिजीतचं आसावरीवरचं अपार प्रेम आणि आसावरीचे सासरे दत्ताजी यांचा या प्रेमाला असणारा विरोध आतापर्यंत आपण बघत आलो. पण आता या मालिकेला एक इंटरेस्टींग वळण येणार आहे. मालिकेतील सोहम म्हणजेच अभिनेता आशुतोष पत्की याने त्याच्या या मालिकेतील अनुभवाविषयी माहिती दिली आहे. 

ऐकलं का? अग्गंबाई, सासूबाई होणार आता नवरीबाई!!

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Aai ani babadya  #agabaisasubai #mummasboy #zeemarathi

A post shared by (@ashutoshpatki) on

आशुतोष हा ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आहे. ही मालिका साकारताना आशुतोषच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक बदल झाले आहेत. हे अनुभव त्य़ाने 'टाइम्स ऑफ इंडिया' ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये शेअर केले आहेत. हे अनुभव शेअर करत असताना तो म्हणाला, '' होय य़ा मालिकेतील माझी भूमिका काहीशी नकारात्मक आहे. सोहम हा निष्काळजी, आईची काळजी न करणारा बिघडलेला मुलगा आहे. काही प्रेक्षक मालिका फक्त मालिका म्हणून बघतात तर, काहीजण त्यामध्ये फार गुंतून जातात. त्यामुळे मालिकेतीला मी तसाच आहे असं काहीजणांना वाटू लागले आहे. माझ्या बाबांच्या एका मित्रने त्यांचा चक्क विचारले की आशुतोष खऱ्या आयुष्यातही तसाच आहे का ? एवढचं नाही तर माझ्या शेजारचे मालिकेआधी माझ्याशी नीट वागायचे. पण, आता ते पहिल्याप्रमाणे नीट वागत नाहीत. अनेकदा ते मला दुर्लक्ष करतात.''

या सर्व अनुभवांकडे आशुतोष सकारात्मकतेने पाहतो असेही त्याने नमुद केले. ही मालिका आशुतोषला कशी मिळाली याविषयी त्याने सांगितले. आशुतोष म्हणाला,'' सहा वर्षांपूर्वी मी करीअरला सुरुवात केली. आधी मी केदार शिंदेसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यामुळे सुनिल भोसले यांनी माझं काम पाहिलं होतं. बाबांनी सुनिल यांच्याशी माझी ओळकही करुन दिली होती. 'अग्गंबाई सासूबाई' साठी मा ऑडिशन दिली होती पण, माझी निवड होईल याची मला खात्री नव्हती. त्यामुळे ऑडिशननंतर मी मित्रांसोबत गोव्याला फिरायला गेलो होतो. पोहचताक्षणीच मला सुनिल भोसले यांचा फोन आला आणि त्यांनी कॉस्च्युम ट्रायलसाठी मला बोलावले. माझ्या उत्सुकता शिगेला पोहोचली आणि मी फ्लाइटची बुकिंग करुन लगेचच गोव्याहून निघालो.''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

'If you judge the character, you can't play it'  -Alan Rickman #beingsoham #agabaisasubai #zeemarathi . - @prathamesh_ps_photography

A post shared by  (@ashutoshpatki) on

आता या मालिकेमध्ये नवीन आणि इन्टरेस्टिंग टर्न येणार आहे. साधारण पन्नाशीच्या वर असलेलं वय, घरात सासरे, मुलगा-सून अशा परिस्थितीत अडकलेली आसावरी (निवेदिता सराफ)... एक यशस्वी शेफ आणि उद्योजक असलेला अभिजीत (गिरीश ओक) एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण आजूबाजूच्या परिस्थितीमुळे व दत्ताजींनी परवानगी दिली नाही म्हणून त्यांना लगेच लग्न करता येत नाही. असावरीची असाह्यता आणि अभिजीतचा असलेला संयमी स्वभाव यांमुळे हे प्रेम टीकून आहे.

अभिजीतने दत्ताजींचं मन वळविण्याचा खूप प्रयत्न केला. तुमच्या सुनेला सुखी ठेवेन ही खात्री दिली, तरी अभिजीत काही दत्ताजींना पसंत पडेना. पण आता अभिजीतने अशी काही जादू केलीय की दत्ताजींनीही या लग्नाला परवानगी दिली आहे. संक्रांती दिवशी म्हणजे आजच्या भागात  दत्ताजी या दोघांच्या लग्नाला परवानगी देतील. तर 19 जानेवारीला या लग्नाचा दोन तासांचा सोहळा झी मराठीवर पार पडेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor ashutosh patki shared his experience from serial aagabai sasubai