'सँडविच फॉरेव्‍हर' मधून अतुल कुलकर्णी विनोदी भूमिकेत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 December 2020

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अमीट ठसा उमटविणाऱ्या अभिनेता अतुल कुलकर्णी कायम वेगवेगळ्या भूमिकेच्या शोधात असतो. त्याच्या त्या चित्रपटातील आणि वेबसिरीज मधील भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीची ठरते. आताही तो एका वेगळ्या प्रकारच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी अतुल कुलकर्णी हा बंदीश बँडिट्स' या सीरीजमध्ये दिसला होता.

मुंबई - आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अमीट ठसा उमटविणाऱ्या अभिनेता अतुल कुलकर्णी कायम वेगवेगळ्या भूमिकेच्या शोधात असतो. त्याच्या त्या चित्रपटातील आणि वेबसिरीज मधील भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीची ठरते. आताही तो एका वेगळ्या प्रकारच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी अतुल कुलकर्णी हा बंदीश बँडिट्स' या सीरीजमध्ये दिसला होता. 

'सँडविच फॉरेव्‍हर'असं अतुल कुलकर्णी यांच्या आगामी वेग सीरिजचं नाव आहे. या सिरीजमध्‍ये ते निवृत्त रॉ एजंट व नैनाचे (आहाना कुमरा) वडिल व्‍ही. के. सरनाईक यांची भूमिका साकारत आहेत. या सिरीजमध्‍ये ते कडक शिस्‍तीच्या व्‍यक्‍तीची भूमिका साकारत आहेत, जो वेळी खूपच कडक वागतो. त्‍याचे एकमेव मिशन आहे, ते म्‍हणजे त्‍याचा जावई समीरला (कुणाल रॉय कपूर) शिस्‍तबद्ध बनवणे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्‍यांच्‍या मते, समीर राज्‍यस्‍तरीय बॅडमिंटन खेळाडू असलेली त्‍याची मुलगी नैनासाठी योग्‍य जोडीदार नाही. त्‍यांच्‍यामधील अभिनयाचं कौतुक झाल्यानंतर अभिनेते अतुल कुलकर्णी आणखी एका सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.'बंदीश बँडिट्स' या सीरीजमधील अभिनयाचं कौतुक झाल्यानंतर अभिनेते अतुल कुलकर्णी आणखी एका सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नेहमीच गंभीर प्रकारच्या भूमिका साकारणारे अतुल कुलकर्णी यांचा एक वेगळाच आणि कुणीही न पाहिलेला अंदाज या नव्या सीरिजमध्ये दिसणार आहे.

फॅमिली मॅन 2 चे पोस्टर व्हायरल, प्रेक्षकांची उत्सुकता वाढली

'बंदीश बँडिट्स' या सीरीजमध्ये अतुल कुलकर्णी यांच्या भूमिकेचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले होते. त्यानंतर तो आता वेगळ्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. याविषयी प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. त्यामुळे नेहमीच गंभीर प्रकारच्या भूमिकेत दिसणारा अतुल कुलकर्णी यांचा वेगळा अंदाज यावेळी पाहता येणार आहे. आपल्या या नव्या भूमिकेविषयी बोलताना कुलकर्णी म्हणाले,या भूमिकेने मला मुख्‍य कन्टेन्टमध्‍ये कधीच न मिळालेली शैली साकारण्‍याची संधी दिली. माझ्या मर्यादांपलीकडील विविध पैलू शोधण्‍यामध्‍ये मदत करणा-या भूमिका मिळाल्‍याने मी स्‍वत:ला भाग्‍यवान समजतो. 'सँडविच फॉरेव्‍हर'मध्‍ये असे उत्तम कलाकार व टीमसोबत काम करण्‍याचा अनुभव अद्भुत होता. 

'कुणाला काही प्रॉब्लेम असल्यास मला अनफॉलो करा' 

या मालिकेचे दिग्दर्शन रोहन सिप्‍पी यांनी केले आहे. मालिकेत एका तरूण विवाहित जोडप्‍याच्‍या अवतीभोवती फिरते. त्‍यांचे पालक त्‍यांचे शेजारी बनतात, तेव्‍हा त्‍यांच्‍या जीवनाला वेगळी दिशा मिळते. ही सीरिज सोनी लिववर पाहता येणार आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor atul kulkarni comeback new serise sandwich forever comedy genere